Ramayana Movie Ravi Dubey Lakshman Role : रवि दुबे यांनी पत्नीपासून लपवली कास्टिंग? जाणून घ्या संपूर्ण गोष्ट!”

Ramayana Movie Ravi Dubey Lakshman Role : मित्रांनो, बॉलिवूडमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला प्रोजेक्ट म्हणजे रामायण. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या भव्य चित्रपटाची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा आहे. हनुमान जयंती या शुभदिनी चित्रपटाचा टीझर रिलीज होणार असल्याने उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम यांच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांचा पहिला लुक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

पण या सगळ्या भव्यतेमध्ये एक खूपच रोचक आणि थोडीशी मजेशीर गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे Ramayana Movie Ravi Dubey’ हा विषय सध्या चर्चेत आला आहे. या चित्रपटात रवि दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहेत, पण विशेष म्हणजे त्यांनी ही एवढी मोठी बातमी स्वतःच्या पत्नीपासूनही लपवून ठेवली होती.

Ramayana Movie Ravi Dubey

Ramayana Movie Ravi Dubey: पत्नी पासून भूमिका लपवून ठेवली?

बॉलिवूडमधील मोठ्या प्रोजेक्ट्सबाबत कलाकार घरच्यांशी लगेच आनंद शेअर करतात, अशी आपली सवय आहे. पण रवि दुबे यांनी मात्र याला अपवाद ठरवत एक वेगळाच मार्ग निवडला. रामायण सारख्या भव्य चित्रपटात लक्ष्मणाची भूमिका मिळूनही त्यांनी ही बातमी पत्नी सरगुन मेहता यांच्यापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवली. यामागचं कारण जितकं साधं, तितकंच रोचकही आहे.

सरगुन मेहताने एका पॉडकास्टमध्ये याबद्दल खुलासा करत सांगितलं की, त्यांच्या नात्यात एक वेगळाच “अलिखित नियम” आहे. दोघंही आपापल्या कामाबद्दल फारशी चर्चा करत नाहीत. कोणताही प्रोजेक्ट अधिकृतपणे जाहीर होईपर्यंत ते एकमेकांना त्याची माहिती देत नाहीत. म्हणजेच, सरगुनचे प्रोजेक्ट्स रविला आधीपासून माहिती नसतात आणि रविचे प्रोजेक्ट्स सरगुनपासूनही तितक्याच गुपित ठेवले जातात. हा नियम त्यांच्या नात्यातील विश्वास आणि स्पेस दाखवतो.

याच नियमामुळे रवि दुबे यांनी ‘रामायण’मधील आपली भूमिका पूर्णपणे गुपित ठेवली. विशेष म्हणजे, शूटिंग सुरू असतानाही त्यांनी काहीच उघड केलं नाही. जेव्हा सरगुन त्यांना विचारायची की, “तू कुठे चाललायस?”, तेव्हा रवि फक्त एकच उत्तर द्यायचे की, “मी कामावर जातोय.” या साध्या उत्तरामागे एवढं मोठं रहस्य दडलं आहे, याची सरगुनला अजिबात कल्पना नव्हती.

सरगुनची उत्सुकता मात्र दिवसेंदिवस वाढत होती. तिला जाणून घ्यायचं होतं की नेमकं काय चाललंय. एक-दोन वेळा तर तिने ड्रायव्हरलाही विचारलं, “सेटवर वातावरण कसं आहे?” पण तिथेही काही ठोस माहिती मिळाली नाही. ही सगळी परिस्थिती थोडी मजेशीर, तशीच तिला थोडी रहस्यमय देखील वाटत होती.

Ramayana Movie Ravi Dubey: पत्नी सरगुन मेहताला हे सत्य कसं कळलं?

या सगळ्या गुपिताचा शेवटही तितकाच रोचक आहे. सरगुनला रविच्या कास्टिंगबद्दल थेट त्याच्याकडून नाही, तर इतर लोकांकडून कळलं. कोणीतरी तिला अचानक “अभिनंदन” दिलं. पण सरगुनने लगेचच त्याला थांबवलं आणि म्हणाली, “मला काही माहिती नाही, आणि आम्ही एकमेकांना सांगत नाही, त्यामुळे मला सांगू नकोस.”नंतर तिने ही बातमी ऑनलाइन वाचली आणि तिला सगळं समजलं. मात्र, तिने तरीही रविला थेट विचारलं नाही. ही गोष्ट त्यांच्या नात्यातील विश्वास आणि समजूतदारपणाचं एक वेगळंच उदाहरण ठरते.

Ramayana Movie Ravi Dubey: रवि दुबे यांच्या करिअरमधील मोठी झेप !!

मित्रांनो रवी दुबे साठी हा प्रोजेक्ट म्हणजे करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. टीव्ही इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर रवि दुबे आता मोठ्या पडद्यावर दमदार पाऊल टाकण्यासाठी सज्ज झाले आहेत. रामायण सारख्या भव्य आणि बहुप्रतिक्षित चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री मिळणं, हे कोणत्याही कलाकारासाठी स्वप्नपूर्तीपेक्षा कमी नाही. विशेष म्हणजे, लक्ष्मणासारखी अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी भूमिका त्यांना साकारण्याची संधी मिळाली आहे. लक्ष्मण हा केवळ रामाचा भाऊ नसून त्याग, निष्ठा आणि पराक्रमाचं प्रतीक मानला जातो, त्यामुळे ही भूमिका निभावणं हे मोठं आव्हान देखील आहे.

रवि दुबे यांच्यासाठी हा चित्रपट त्यांच्या करिअर ला कलाटने देणारा ठरू शकतो. कारण आतापर्यंत त्यांनी छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, पण आता ते एका मोठ्या पॅन-इंडिया प्रोजेक्टचा भाग बनले आहेत. त्यामुळे त्यांच्या अभिनयाची खरी कसोटी लागणार आहे आणि त्यांच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

शिवाय, या चित्रपटाची स्टारकास्ट देखील तितकीच भव्य आहे. साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत तिच्या साधेपणा आणि भावनिक अभिनयासाठी ओळखली जाते, तर यश रावणाच्या दमदार आणि प्रभावी भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार असल्याने चित्रपटात ताकद आणि उर्जा दोन्ही वाढणार आहेत. तसेच अरुण गोविल यांच्यासारख्या अनुभवी कलाकाराची उपस्थिती या चित्रपटाला आणखी वजनदार बनवते.एकंदरीत, ‘रामायण’ हा केवळ एक चित्रपट नसून, भारतीय संस्कृती आणि परंपरेचं भव्य चित्रण आहे. आणि या मोठ्या प्रोजेक्टमुळे रवि दुबे यांच्या करिअरला नवी उंची मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.

Ramayana Movie Ravi Dubey : चित्रपटाची वाढती क्रेझ

रामायण हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू बनला आहे. या भव्य प्रोजेक्टचा पहिला भाग दिवाळीच्या सणात प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली असून, दुसरा भाग 2027 मध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची एक नव्हे तर दोन भागांत अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

दरम्यान, लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्कसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये झालेल्या विशेष स्क्रीनिंगमुळे या चित्रपटाची चर्चा केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही रंगू लागली आहे. या खास झलक पाहिलेल्या प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

विशेषतः रणबीर कपूर यांच्या रामाच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता, डोळ्यांतील स्थिरता आणि व्यक्तिमत्त्वातील आध्यात्मिक झळाळी यामुळे ते या भूमिकेत अगदी समर्पक वाटत आहेत. अनेक चाहत्यांनी त्यांच्या या लूकचं कौतुक करत, तो “दिव्य” आणि “प्रभावी” असल्याचं म्हटलं आहे.एकंदरीत, ‘रामायण’ हा चित्रपट केवळ एक मनोरंजनाचा भाग नसून, एक भव्य आणि भावनिक अनुभव ठरणार आहे, अशी अपेक्षा प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

Ramyana Teaser Marathi Review 2026 : टीझर पाहून फॅन्स झाले एक्साइटेड, मोठ्या ब्लॉकबस्टरची चाहूल !! येथे वाचा 👈

Leave a Comment