Shikhar Dhawan Got Married 2026: विवाह स्थळ, तारीख, पाहुणे जाणून घ्या संपूर्ण अपडेट्स

भारतीय क्रिकेट विश्वातील गब्बर मानला जाणारा शिखर धवन हा सोफिया शाईन या आयरीश मुली सोबत विवाह बंधनात अडकला आहे. अलीकडच्या काळात शिखर हा त्याच्या एका वैयक्तिक मनस-तापातून जात होता हे सर्वांनाच माहीत होते. परंतु पुन्हा एकदा विवाह करत असल्यामुळे शिखर धवन हा चर्चेचा विषय बनला आहे.

शिखर धवनचा विवाह हा २१ फेब्रुवारी २०२६ रोजी शनिवारी दिल्ली मधील एन.सी.आर. येथे अत्यंत खाजगी पद्धतीने पार पडला. आणि परत एकदा मागच सगळ विसरून शिखरने आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्याच्या या निर्णयाचे त्याच्या फॅन्स ने देखील स्वागत केले तसेच त्याला आणि त्याच्या परिवाराला शुभेच्छा देखील दिल्या.

Shikhar Dhawan Got Married With Sophie Shine 2026

Shikhar Dhawan Got Married 2026 : विवाह स्थळ आणि तारीख

भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन याचा विवाह खाजगी पद्धतीने २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्ली NCR येथे सोफिया शाईन या त्याच्या गर्लफ्रेंड सोबत खाजगी पद्धतीने पार पडला.

धवनने स्वतः सोशल मीडियावर मिस्टर अँड मिसेस धवन असा कॅप्शन लिहीत फोटो पोस्ट केला. आणि त्याच्या या निर्णयाचा त्याच्या फॅन्स आनंदाने स्वागत केला. तसेच दोन्हीही जोडप्यांना भरपूर शुभेच्छा दिल्या.

Shikhar Dhawan Got Married 2026 : लग्न सोहळ्यात कोणा कोणाला आमंत्रण होते?

भारतीय पूर्व क्रिकेटर शिखर धवन आणि सोफिया शाईन यांच्या लग्न सोहळा मध्ये अनेक सेलिब्रिटींनी भाग घेतला होता आणि आपला आनंद देखील व्यक्त केला होता. त्यामध्ये युजवेंद्र चहल, करिष्मा कोटक, सुनील ग्रोवर, हुमा कुरेशी यांचा सहभाग होता तसेच शिखर धवन चे क्रिकेट मधील अन्य सहकारी, सिने जगतातले अनेक दिग्गज, स्थानिक राजकारणी, मॉडेल्स आणि शिखर धवन चे आप्तेष्ट मंडळी उपस्थित होते.

शिवाय अन्य सेलिब्रिटी जे या विवाह सोहळ्याला काही कारणांमुळे पोहचू शकले नाही जसे की विराट कोहली, जॅकलीन फर्नांडिस, रवींद्र जडेजा, रणवीर सिंग यांनी आणि यांसारख्या समाजातील कलाकारांनी आणि क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावरून शिखर धवनला भावी आयुष्यासाठी आणि वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Shikhar Dhawan Got Married 2026: शिखर धवन ची नवीन पत्नी सोफिया शाईन कोण आहे?

शिखर धवन ची नवीन पत्नी सोफिया शाईन हिचा जन्म आयर्लंड या देशात झाला. सोफीया ही उच्चशिक्षित आहे. तसेच तिने आयर्लंड मधील Castleroy College या महाविद्यालयामध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे. आणि सध्या ती दुबई स्थित अबूधाबी येथे Northern Trust Corporation मध्ये Second Vice President या पदावर कार्यरत आहे.

Shikhar Dhawan Got Married 2026: लग्न सोहळ्यामधील काही क्षणांचा तपशील पाहूया.

शिखर धवन आणि सोफिया शाईन यांच्या लग्नामध्ये अनेक समाजातील सेलिब्रिटींनी आपली उपस्थिती दर्शवली. आणि लग्नाचा मनमुराद आनंद घेतला. शिखर धवन चा क्रिकेट क्षेत्रातील सर्वात जवळचा मित्र आणि त्याच्याबरोबर सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारा क्रिकेट सेलिब्रिटी म्हणजेच युजवेंद्र चहल याने “आज मेरे यार की शादी है” या गाण्यावर जबरदस्त डान्स परफॉर्मन्स केला. आणि लग्नाचे वातावरण अजून मजेशीर बनवले.

तसेच शिखरची पत्नी सोफिया शाईन हिने देखील बॉलीवूडच्या अनेक गाण्यांवर डान्स करून आपला आनंद व्यक्त केला. परंतु बॉलीवूडच्या बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालणारा सिनेमा म्हणजेच धुरंदर यामधील शरारत या गाण्यावर डान्स करताना सोफिया ही प्रामुख्याने दिसून आली. तसेच उपस्थित सर्व सेलिब्रिटींनी आपापल्या पद्धतीने डान्स करत आनंद व्यक्त केला.

Shikhar Dhawan Got Married 2026: शिखर धवन चे हे दुसरे लग्न आहे का ?

होय, शिखर धवनचे हे दुसरे लग्न आहे. याआधी शिखर धवनचे लग्न हे आयशा मुखर्जी सोबत ३० ऑक्टोबर २०१२ रोजी दिल्लीमधील एका गुरुद्वारामध्ये सीख पद्धतीने आणि रीती रिवाजानुसार पार पडले होते. आणि विवाहनंतर सर्व आप्तेष्ट मंडळींसाठी वसंत कुंज (दिल्ली ) येथे भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते.

Shikhar Dhawan Got Married 2026: शिखर धवन आणि सोफिया शाईन यांचे लव्ह मॅरेज आहे की अरेंज ?

होय, भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन आणि त्याची विद्यमान पत्नी सोफिया शाईन यांचे हे लव्ह मॅरेज आहे. शिखर आणि सोफियाची पहिली भेट ही दुबईमध्ये काही कामानिमित्त झाली होती. तसेच या मुलाखतीनंतर अधून मधून कामानिमित्त त्यांच्या भेटीगाठी या वरवर होत असत.

सोफिया चा साधे भोळेपणा हा शिखरला हळूहळू आवडू लागला. तसेच त्यांच्या या भेटीगाठीचे रूपांतर मैत्रीमध्ये देखील झाले. शिखरच्या पहिला घटस्फोटा बद्दल जेव्हा सोफिया समजले तेव्हा तिलाही त्याच्याबद्दल वाईट आणि हळहळ वाटू लागली. शिखर धवन च्या या पडत्या काळात सोफियाने शिखरला मानसिक साथ आणि आधार दिला.

नंतर त्यांचा हा प्रवास एवढा पुढे गेला की सोफियाच्या मनात देखील शिखर बद्दल प्रेम भावना उत्पन्न झाली. आणि इथून दोघांच्या आयुष्याचा नवीन प्रवास सुरू झाला. फॅन्स आणि पब्लिक मध्ये पहिली चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा IPL २०२४ मध्ये सोफिया ही शिखर ला आणि त्याच्या टीम ला प्रोत्साहन द्यायला आणि सपोर्ट करायला पहिल्यांदा क्रिकेट स्टेडियम मध्ये आली. त्यानंतर २०२५ मध्ये देखील चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये शिखर आणि सोफिया एकत्र दिसून आले.

आणि त्या नंतर शिखरे धवन ने देखील आपल्या या नवीन प्रेमाची ‘my love’ असे कॅप्शन लिहीत इंस्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर फोटो शेअर केले आणि आपल्या प्रेमाची घोषणा केली.

Leave a Comment