Hello Bachhon Review In Marathi 2026 : ( रिव्यू आणि संपूर्ण माहिती, कथा, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, ट्रेलर, स्टार परफॉर्मन्स, बजेट, स्ट्रीमिंग अँड व्ह्यूअरशिप, एकूण भाग, OTT प्लॅटफॉर्म, शूटिंग लोकेशन )

Hello Bachhon Review In Marathi 2026 : प्रतिष मेहता दिग्दर्शित हॅलो बच्चो ही वेबसिरीज सध्या Netflix वर खूप धुमाकुळ घालत आहे. ६ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेली ही सीरिज विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी देखील खूप प्रेरणादायी आहे.
Hello Bachhon Review In Marathi 2026 : रिव्यू आणि माहिती
एका शिक्षकाने ठरवलं तर तो कसा विद्यार्थ्यांना घडवू शकतो. आणि समाजापुढे एक ज्वलंत उदाहरण बनू शकतो हे ही वेबसरीस पाहून समजते. या सिरीज मध्ये एका शिक्षकाची आपल्या विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ समजते. तसेच विद्यार्थ्यांनी ही आपल्या शिक्षकांच्या मेहनतीला कसा योग्य तो न्याय दिलाय? ते पण या सिरीज मधून दिसून येते.
| घटक | माहिती |
|---|---|
| सीरिजचे नाव | हॅलो बच्चो (Hello Bachhon) |
| दिग्दर्शक | प्रतिष मेहता |
| कथा लेखक | अभिषेक यादव, अंकित यादव, वर्नाली, संदीप सिंह |
| कलाकारांची नावे | विनीत कुमार सिंग, विक्रम कोचर, गिरीजा ओक गोडबोले, वरुण बुद्धदेव |
| रिलीज डेट | ६ मार्च २०२६ |
| बजेट (अंदाजे) | ₹१५ – २० कोटी |
| OTT प्लॅटफॉर्म | Netflix वर पहा |
| शूटिंग लोकेशन | कानपूर आणि प्रयागराज |
| रेटिंग (IMDb) | ५.२/१० |
Hello Bachhon Review In Marathi 2026 : कथा (story)
या वेबसरीस मध्ये विनीत कुमार सिंह यांनी मुख्य सरांची म्हणजेच अलख पांडे सरांची भूमिका केलीय. अलख पांडे सर हे मूळचे प्रयागराज इथले नागरिक असतात. लहानपणापासून आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये कशा प्रकारचे गडबड गोंधळ आहेत हे त्यांना चांगलेच ठाऊक असते. शिवाय शिक्षण हा मूलभूत अधिकार असला तरी आपल्या एज्युकेशन सिस्टीम नुसार गरीब मुलांना उच्च शिक्षण घेणे म्हणजे जवळजवळ अशक्य गोष्ट आहे असे त्यांना वाटते. कोचिंग क्लासेस, कॉलेज आणि इतर अभ्यासाचा खर्च या सर्व गोष्टी खर्चिक बाब असल्यामुळे ही शिक्षण पद्धती म्हणजे एज्युकेशन माफीया आहे असा त्यांचा समज होतो आणि म्हणून ज्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचंय परंतु पैशाअभावी ज्यांना घेता येत नाही आहे अशा मुलांसाठी ते कोचिंग क्लास सुरू करतात आणि इथून सुरू होतो ‘Physics Wallah‘ या कोचिंग क्लासेसच्या क्रांतिकारी अध्याय.
वेब सिरीज मध्ये अलख सरांच्या वाटेत अनेक अडचणी येताना आपल्याला दिसतात. कधी कधी कमी पगारामुळे शिक्षक नोकरी सोडून जातात. तर कधी कधी त्यांच्या टीम मधील मेंबर्स इन्व्हेस्टमेंट साठी काही रक्कम लागेल असा सल्ला देतात. तर कधी कधी इतर गोष्टींच्या दबावाचाही त्यांना सामना करावा लागतो.
आणि या सर्व परिस्थितीला योग्यरीत्या तोंड देऊन त्यावर मात करून अलक सर गरीब विद्यार्थ्यांसाठी जे पैशाअभावी शिक्षणापासून दूर आहेत. त्यांच्यासाठी कसे आशेचे किरण बनतात? आणि अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कशाप्रकारे मदत करतात? हे या सिरीज मध्ये दाखवले गेले आहे.
Hello Bachhon Review In Marathi 2026 : ट्रेलर (Trailer)
Hello Bachhon Review In Marathi 2026 : कलाकार आणि त्यांची कामगिरी (star performance)
कलाकारांची नावे –
| कलाकाराचे नाव | सीरिजमधील पात्राचे नाव (Character) |
|---|---|
| विनीत कुमार सिंग | अलख पांडे (Physics Wallah संस्थापक) |
| विक्रम कोचर | प्रतीक माहेश्वरी (अलख यांचा मित्र आणि सह-संस्थापक) |
| गिरीजा ओक गोडबोले | अलख पांडे यांची आई |
| वरुण बुद्धदेव | तरुण अलख पांडे |
| समता सुदीक्षा | अदिती |
| सतेंद्र सोनी | विद्यार्थी / सहाय्यक पात्र |
कलाकारांची कामगिरी( star performance ) –
या सिरीज मध्ये विनीत कुमार यांनी शिक्षकाच्या भूमिकेला परिपूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. विनीत कुमार यांनी मुख्य शिक्षकाची भूमिका म्हणजेच अलख सरांची भूमिका निभावली आहे. त्यासाठी विनीत कुमार यांनी कुठचीही अति नक्कल न करता एक ध्येयाला वाहून घेणारा शिक्षक कसा असतो याचा जिवंत अभिनय केला आहे.
अलख सरांसोबत कायम सावली सारखे सोबत असणारे सहकारी म्हणजेच प्रतिक सर यांची भूमिका विक्रम कोच्चर यांनी उत्तमरीत्या पार पाडली आहे. अलख सरांच्या या प्रवासात अनेक अडथळे येतात किंवा अपयश येतात तेव्हा इतरांसारखे ते देखील हा प्रवास अर्ध्यावरच थांबवायचा असा विचार करतात. आणि जेव्हा प्रतीक सरांना हे समजते तेव्हा “जो लोग practical होते हैं वो सही रास्ते पर चलते हैं, लेकिन जो लोग delusional होते हैं वो हर रास्ते को सही बना देते हैं.” असे सांगून अलख सरांना प्रोत्साहन देतात. व त्यानंतर अलख सर परिस्थितीला न डगमगता पुन्हा एकदा आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी कसे सज्ज होतात हे या सिरीज मध्ये पाहण्या सारखे आहे.
मराठी अभिनेत्री गिरिजा ओक देखील आपल्याला अलख सरांच्या बहिणीच्या भूमिकेत पहायला मिळते. एखाद्या बहिणीनी आपल्या भावाला त्याच्या पडत्या काळात कसे पाठबळ दिले पाहिजे या भूमिकेला गिरिजा ओक ने अत्यंत योग्य न्याय दिलाय. शिवाय नमन जैन (लक्ष्य शर्मा), सत्येंद्र सोनी (भोला), वरून बुद्धदेव (अंकित यादव), समता सुदीक्षा (तृप्ती दहिया), आणि सोनू कुमार (हरिया) या सर्व कलाकारांनी विद्यार्थ्यांची भूमिका पार पाडून सिरीज मध्ये एक वेगळाच आकर्षण तयार केले आहे.
Hello Bachhon Review In Marathi 2026 : सिरीज पहावी का नाही ?(Watch OR Not)
नक्कीच, ही वेब सिरीज आवर्जून पहावी अशी आहे. या सिरीज मध्ये शिक्षण देणारा आणि शिक्षण घेणारा कसा असावा ? याच सुंदर चित्रीकरण केले आहे. जर एखादा विद्यार्थी अडत असेल किंवा अयशस्वी होत असेल तर त्या विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकाचाही ते अपयश आहे हे समजून शिक्षकांनी वद्यार्थ्यांसाठी कितपत झटला पाहिजे ? ते समजते. तसेच परिस्थिती अभावी शिक्षण टाळण म्हणजे किती मूर्खपणा हे ही या वेब सिरीज मधून शिकायला मिळते. कारण समाजात असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी एकदम प्रतिकूल परिस्थितीमधून स्वतःला घडवल आणि आज ते उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे ही वेब सिरीज आवर्जून पहावी असे आम्हाला वाटते.
Hello Bachhon Review In Marathi 2026 : स्ट्रीमिंग आणि व्ह्यूअरशिप अपडेट्स ( Streaming & Viewership Updates)
| अपडेट प्रकार | सध्याची स्थिती / माहिती |
|---|---|
| अधिकृत प्लॅटफॉर्म | Netflix India (Live) |
| रिलीज स्टेटस | सर्व ५ भाग उपलब्ध (६ मार्च २०२६ पासून) |
| नेटफ्लिक्स रँकिंग | इंडिया टॉप १० लिस्टमध्ये ट्रेंडिंग (अपडेट सुरू) |
| व्ह्यूअरशिप रिस्पॉन्स | अलख पांडे यांच्या चाहत्यांमुळे सुरुवातीचा मोठा प्रेक्षकवर्ग (High Early Buzz) |
| अधिकृत वॉच अवर्स | नेटफ्लिक्सच्या साप्ताहिक रिपोर्टमध्ये (मंगलवार) जाहीर होतील |
| सोशल मीडिया ट्रेंड्स | ट्विटर आणि इंस्टाग्रामवर #HelloBachhon ट्रेंड होत आहे |
FAQ –
1)Hello Bachhon वेब सिरीज कशाबद्दल आहे?
उत्तर – Hello Bachhon ही वेब सिरीज प्रसिद्ध फिजिक्स शिक्षक Alakh Pandey यांच्या आयुष्यावर आधारित आहे. एका छोट्या शहरातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आणि Physics Wallah या एडटेक कंपनीची सुरुवात कशी झाली, हे या मालिकेत दाखवले आहे.
2) Hello Bachhon सिरीज मध्ये मुख्य भूमिका कोणाची आहे?
उत्तर – या सिरीज मध्ये Vineet Kumar Singh यांनी अलख पांडेय यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत Vikram Kochhar आणि Girija Oak Godbole देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतात.
3) Hello Bachhon मध्ये किती भाग आहेत?
उत्तर – Hello Bachhon या सिरीज मध्ये एकूण ५ भाग आहेत आणि प्रत्येक भाग सुमारे ४५ मिनिटांचा आहे.
4) Hello Bachhon ही खरी कथा आहे का?
उत्तर – हो, ही वेब सिरीज सत्य घटनेवर आहे.
5) Hello Bachhon वेब सिरीज कुठे पाहू शकतो?
उत्तर – ही सिरीज Netflix या OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.