Aspirants 3 Review In Marathi 2026 : अभिलाष आणि संदीप भैय्या यांच्यातील प्रोफेशनल संघर्ष

Aspirants 3 Review In Marathi 2026 : ( रिव्यू आणि माहिती, कथा, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, गायक, संगीत, ट्रेलर रिलीज डेट, बजेट, ड्युरेशन, स्टार परफॉर्मन्स, गुड ऑर बॅड, OTT रिलीज प्लॅटफॉर्म, तिकीट बुकिंग, शूटींग लोकेशन )

Aspirants 3 Review In Marathi 2026 : Aspirants या लोकप्रिय वेबसीरिजचा तिसरा सीझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिग्दर्शक Deepesh Sumitra Jagdish यांनी या सीझनचे दिग्दर्शन केले असून ही मालिका १३ मार्च २०२६ रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित झाली.

UPSC च्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांचे स्वप्न, संघर्ष, मैत्री आणि आयुष्यातील कठीण निर्णय यांची कथा सांगणारी ही वेबसीरिज सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय ठरली आहे. आता या तिसऱ्या पर्वा मध्ये अजूनच धमाकेदार गोष्टी आपल्याला पहायला मिळणार आहे.

Aspirants 3 Review In Marathi 2026

Aspirants 3 Review In Marathi 2026 : रिव्यू आणि संपूर्ण माहिती

घटक माहिती
वेब सिरीजचे नाव Aspirants – Season 3
रिलीज दिनांक 13 मार्च 2026
दिग्दर्शक Deepesh Sumitra Jagdish
लेखक Anurag Goswami, Anurag Shukla
डायलॉग रायटर TVF लेखन टीम
गायक माहिती उपलब्ध नाही
संगीत माहिती उपलब्ध नाही
बजेट अधिकृत माहिती उपलब्ध नाही
OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर पहा
एकूण एपिसोड 5 एपिसोड
ड्युरेशन प्रत्येक एपिसोड सुमारे 40–50 मिनिटे
तिकीट बुकिंग लागू नाही (OTT रिलीज)
शूटिंग लोकेशन दिल्ली (मुखर्जी नगर)
निर्मिती संस्था The Viral Fever (TVF)

Aspirants 3 Review In Marathi 2026 : Treilar (ट्रेलर)

Aspirants 3 Review In Marathi 2026 : कलाकारांची नावे आणि पात्र

कलाकार पात्राचे नाव
नवीन कस्तुरिया अभिलाष शर्मा
सनी हिंदुजा संदीप भैया (संदीप ओहळ)
अभिलाष थपलियाल एस.के. (श्वेतकेतु)
शिवांकित सिंह परिहार गुरी / गुरप्रीत
नमिता दुबे धैर्या
कुलजीत सिंह भुवन

Aspirants 3 Review In Marathi 2026 : कथा (Story)

UPSC च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर मैत्री, स्वप्न आणि वास्तव यांच्यातील संघर्ष दाखवणाऱ्या या वेबसीरिजचा हा तिसरा सीझन प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा भावनिक आणि विचार करायला लावणारा अनुभव ठरतो.

या season मध्ये कथा एक विचित्र वळणावर येऊन थांबते. अभिलाष ज्याला आपल्या UPSC क्षेत्रा मधला आयडॉल मानत असतो. तो संदीप भैय्या असा आरोप करतो की रामपूरचा जिल्हाधिकारी (DM) म्हणजेच अभिलाष एका सरकारी टेंडरच्या प्रक्रियेत आपल्या मित्राला फायदा करून देतो. आणि या आरोपामुळे अभिलाषवर प्रश्न चिन्ह उपस्थित होतात आणि दोघांमध्ये मोठा तणाव निर्माण होतो.

परंतू अभिलाष ला स्वतःच्या प्रामाणिक पणावर खूप विश्वास असतो. तो मोठ्या हिंमतीने या सर्व आरोपांना सामोरे जातो. आणि स्वतःची स्वच्छ प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करतो. गोष्टी मध्ये अजून एक ट्विस्ट येतो ते म्हणजे कोण तरी जुना व्यक्ती जो अभिलाष च्या एकदम जवळचा होता. तो परत त्याच्या life मध्ये येतो आणि त्याला त्याच्या professional life मध्ये काही आवाहन देतो. तर तो व्यक्ती कोण? आणि अभिलाष कसा या सर्व परिस्थितीला योग्यरीत्या तोंड देतो. हे आपल्याला webseries पाहूनच समजेल. त्यामुळे ही series आवर्जून पाहावी असे मला वाटते.

Aspirants 3 Review In Marathi 2026 : स्टार परफॉर्मन्स (Star performance)

कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर Aspirants च्या तिसऱ्या सीझनमध्ये सर्व कलाकारांनी चांगले काम केले आहे. अभिलाष शर्माच्या भूमिकेत Naveen Kasturia खास उठून दिसतो. त्याने आपल्या पात्रातील बदल अगदी नैसर्गिक आणि विश्वासार्ह पद्धतीने दाखवले आहेत. यावरून असे दिसून येते की खरोखरच एखाद्या पात्राला वाहून घेतलं की आपण ते पात्र अक्षरशः जगतो. आणि अभिलाष च्या Acting Skills वरून ते सहज दिसून येते.

Sunny Hinduja ह्याने ही संदीप भैय्या चे पात्र एकदम उत्तम रित्या साकारले आहे. त्याच्या अभिनयात तीव्रता आणि संयम या दोन्ही गोष्टींचा मेळ तंतोतंत दिसून येतो. कथेतील संघर्ष आणि तणाव अधिक प्रभावी करण्यासाठी Sunny Hinduja म्हणजेच संदिप भैय्या महत्त्वाची भूमिका बजावतो.

तसेच Namita Dubey, Abhilash Thapliyal आणि Shivankit Singh Parihar हे देखील कथेला आपल्या अभियानाच्या माध्यमातून जिवंत ठेवतात.

Aspirants 3 Review In Marathi 2026 : गुड ऑर बॅड (Good Or Bad)

Good

सीझन 3 पाहताना पुन्हा एकदा अभिलाष आणि संदीप भैय्या यांची story बघायला मजा येते. Naveen Kasturia आणि Sunny Hinduja दोघांनीही खूप natural acting केली आहे. मैत्री, career आणि life मधले pressure खूप realistic पद्धतीने दाखवले आहेत, त्यामुळे series easily connect होते.

Bad –

पण काही ठिकाणी story थोडी slow वाटते आणि काही scenes जरा predictable सुद्धा वाटतात. पहिल्या season सारखा freshness काही ठिकाणी कमी जाणवतो.

Aspirants 3 Review In Marathi 2026 : चित्रपट पहावा की नाही ? (Watch OR Not)

नक्कीच हा चित्रपट पाहण्यायोग्य आहे. कारण या चित्रपटांमध्ये अभिलाष हा आपल्या प्रोफेशनल सिव्हिल काम आणि त्याबरोबरच आपल्या जीवनातील इतर सर्व टेन्शन्स कशाप्रकारे हँडल करतो?आणि सर्व परिस्थितींना एकंदरीत कसं बुद्धीने, धैर्याने आणि धाडसाने सामोरे जातो? हे खरोखरच पाहण्यायोग्य आहे.

FAQ

1) Aspirants Season 3 कधी रिलीज झाला?

उत्तर – Aspirants Season 3 हा 13 मार्च 2026 रोजी OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला.

2) Aspirants Season 3 कुठे पाहायला मिळेल?

उत्तर – ही वेबसीरिज Amazon Prime Video वर streaming साठी उपलब्ध आहे.

3) Aspirants Season 3 मध्ये मुख्य कलाकार कोण आहेत?

उत्तर – या सीझनमध्ये Naveen Kasturia, Sunny Hinduja, Abhilash Thapliyal आणि Shivankit Singh Parihar प्रमुख भूमिकेत दिसतात.

4) Aspirants Season 3 ची कथा कशावर आधारित आहे?

उत्तर – या सीझनमध्ये UPSC preparation नंतरचे career pressure, प्रशासनातील challenges आणि मित्रांमधील बदललेले संबंध दाखवले आहेत.

5) Aspirants Season 3 पाहण्यासारखा आहे का?

उत्तर – हो, realistic story, strong acting आणि emotional moments मुळे हा सीझन नक्कीच watchable आहे.

Leave a Comment