Project Hail Mary Movie Review In Marathi 2026 : (कथा, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, गायक, लेखक, रिलीज डेट, ट्रेलर, बजेट, गुड ऑर बॅड, हिट की फ्लॉप, स्टार परफॉर्मन्स, वॉच ऑर नॉट, OTT रिलीज प्लॅटफॉर्म, तिकीट बुकींग, शूटिंग लोकेशन, निष्कर्ष)
मित्रांनो हा चित्रपट science fictions पिक्चर आहे. जो Andy Weir यांच्या सुपरहिट कादंबरीवर बेस्ड आहे. ‘द मार्शियन’ नंतर पुन्हा एकदा त्यांनी स्पेसमध्ये टाकलेला भन्नाट कॉन्सेप्ट इथे पाहायला मिळतो.
कथा एका सायंटिस्टभोवती फिरते, जो अचानक स्पेसमध्ये एकटाच जागा होतो. त्याला काहीच आठवत नसतं की तो कोण आहे? आणि तिथे कसा आला? हळूहळू त्याला कळतं की तो एका जबरदस्त मिशनवर आहे. ते म्हणजे पृथ्वीला वाचवण्याचं मिशन.
पिक्चरमध्ये सायन्स, इमोशन आणि थ्रिल यांचा मस्त मिक्स आहे. फक्त स्पेस शो नाही, तर मेंदूला कामाला लावणारी स्टोरी आहे. व्हिज्युअल्स, स्पेसचं सीन आणि सस्पेन्स सगळंच एकदम नेक्स्ट लेव्हल वाटतं.
२६ मार्च २०२६ ला भारतात रिलीज होणारा हा सिनेमा सायन्स लवर साठी एकदम ट्रीट आहे. “थोडक्यात सांगायचं झालं तर, दिमाग भी घुमेगा और एंटरटेनमेंट भी full मिलेगा”.

Project Hail Mary Movie Review in Marathi 2026 : संपूर्ण माहिती
| घटक | तपशील |
|---|---|
| चित्रपटाचे नाव | प्रोजेक्ट हेल मेरी (Project Hail Mary) |
| रिलीज डेट | २० मार्च २०२६, भारत (२६ मार्च २०२६) |
| दिग्दर्शक | फिल लॉर्ड आणि क्रिस्टोफर मिलर |
| मूळ लेखक (कादंबरी) | अँडी वेअर |
| पटकथा (Screenplay) | ड्र्यू गोडार्ड |
| निर्माते | एमी पास्कल, रायन गॉसलींग, फिल लॉर्ड, क्रिस्टोफर मिलर, आदित्य सूड आणि अँडी वेअर |
| मुख्य कलाकार | रायन गॉसलींग, सँड्रा हुलर, जेम्स ऑर्टिज (रॉकी) |
| डायलॉग रायटर | मूळ: ड्र्यू गोडार्ड (भारतीय भाषांसाठी डबिंग रायटर्स) |
| संगीत | डॅनियल पेंबर्टन |
| गायक | प्रामुख्याने बॅकग्राउंड स्कोअरवर भर (पारंपारिक गाणी नाहीत) |
| बजेट | अंदाजे $२०० दशलक्ष (सुमारे ₹१,६६० कोटी) |
| भाषा | इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू |
| शूटिंग लोकेशन | शेपर्टन स्टुडिओ (Shepperton Studios), युनायटेड किंगडम |
| तिकीट बुकिंग | येथे क्लिक करा (BookMyShow) |
Project Hail Mary Movie Review in Marathi 2026 : कलाकारांची नावे आणि पात्र ( Cast & character)
| कलाकाराचे नाव | पात्राचे नाव | भूमिका / स्वरूप |
|---|---|---|
| रायन गॉसलींग (Ryan Gosling) | रॅलंड ग्रेस (Ryland Grace) | एक विज्ञान शिक्षक जो एका अंतराळ मोहिमेवर जातो. पृथ्वीला वाचवण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. |
| सँड्रा हुलर (Sandra Hüller) | इव्हा स्ट्रॅट (Eva Stratt) | मोहिमेची प्रमुख आणि जगातील सर्वात शक्तिशाली प्रशासक, जी या मोहिमेचे नियोजन करते. |
| जेम्स ऑर्टिज (James Ortiz) | रॉकी (Rocky – Voice/Motion) | एका दुसऱ्या ग्रहावरून आलेला जीव (Alien), जो रॅलंडचा मित्र बनतो आणि त्याला मदत करतो. |
| मिलना व्यायंट्रब (Milana Vayntrub) | अॅनी कुशा (Annie Kusha) | एका वैज्ञानिकाची भूमिका जी पृथ्वीवरील संशोधनात मदत करते. |
Project Hail Mary Movie Review in Marathi 2026 : ट्रेलर (Trailer)
Project Hail Mary Movie Review in Marathi 2026 : कथा (Story)
Project Hail Mary ची सुरुवातच एकदम माईंडब्लोइंग आहे.
रायलंड ग्रेस (Ryan Gosling) नावाचा एक माणूस अचानक स्पेसशिपमध्ये जागा होतो. आणि त्याला काहीच आठवत नसतं! तो कोण आहे? इथे कसा आला? काहीच क्लू त्याला नसतो. हळूहळू गोष्टी अशा घडतात की त्याला समजायला लागतं की तो एका जबरदस्त मिशनवर आहे. ते म्हणजे पृथ्वीला वाचवायचं मिशन !!
Actual प्रॉब्लेम काय असतो? तर ‘Astrophage’ नावाचा एक सूक्ष्म जीव सूर्याची ऊर्जा खात असतो आणि जर हे थांबलं नाही तर पृथ्वी नष्ट होणार म्हणेच पृथ्वीचं गेम ओव्हर! रायलंड हा साधा सायन्स टीचर असतो, पण आता त्याच्यावर पूर्ण मानवजातीची जबाबदारी येते.
आणि मग इथे येतो कहाणी मे ट्विस्ट! त्याला स्पेसमध्ये एक एलियन भेटतो. त्याच्याही ग्रहावर same problem झालेला असतो. व तो पण ही समस्या सोडवण्यासाठी च अंतराळात आलेला असतो. दोघांची भाषा वेगळी असते, जग वेगळं असत. पण समस्या same असल्यामुळे दोघांमध्ये हळू हळू दोस्ती होते. एकमेकांची भाषा समजू लागतात. आणि दोघे ही मग आपापल्या ग्रहाला वाचवण्यासाठी efforts लावतात.
आणि इथून ही स्टोरी अजूनच इंटरेस्टिंग होते. सायन्स, इमोशन, आणि स्पेस ॲडव्हेंचर यांचा असा मिक्स संगम आहे की बघताना वेळ कसा जातो कळतच नाही.
थोडक्यात हा पिक्चर फक्त स्पेसचा नाही, तर दोस्ती आणि जग वाचवण्याची तळमळ आणि जिद्दीचा गेम आहे!”
स्टार परफॉर्मन्स (Star Performance)
Project Hail Mary मध्ये एक्टिंगचा तर फुल धमाका आहे.
सगळ्यात आधी Ryan Gosling याने रायलंड ग्रेस हे पात्र अस झकास उभा केलाय की काय सांगू! ‘Drive’ किंवा ‘Blade Runner 2049’ मधला शांत माणूस इथे पूर्ण उलटा दिसतो बोलका, मजेशीर आणि भावनिक संकटात पण त्याचा विनोद चालूच असतो, आणि जेव्हा त्याला हे सगळ आठवतं ना ते सीन तर थेट हृदयाला भिडतात. एकदम जिवंत अभिनय आपल्याला पहायला मिळतो.
आता येतो गेमचेंजर—रॉकी! James Ortiz ने दिलेला आवाज आणि हालचाली इतक्या भन्नाट आहेत की हे पात्र थेट डोक्यात बसतं. रायलंड आणि रॉकीची दोस्ती म्हणजे पिक्चरची खरी जान आहे. एकदम “जिगरी यार” टाईप त्यांचे संवाद, त्यांचा ट्रस्ट सगळ एकदम इमोशनल कनेक्शन देतं.
Sandra Huller ची इव्हा स्ट्रॅट पण एकदम कडक पात्र आहे. तिचा प्रेझेन्स आला की सीनला वजन येतं. तिचा अभिनय म्हणजे कडक, स्ट्रिक्ट आणि डेडली फोकस्ड वाटतो.
बाकी सपोर्टिंग कास्ट पण काही कमी नाही मिलना व्यायंट्रब, केन लेउंग आणि प्रिया कंसारा यांनी देखील स्टोरीला छान सपोर्ट दिलाय.
Project Hail Mary Movie Review in Marathi 2026 : दिग्दर्शन आणि संगीत (Direction & Music)
दिग्दर्शन (Direction)
सगळ्यात आधी दिग्दर्शकांची जोडी—Phil Lord आणि Christopher Miller. यांचं नाव आलं की आधीच एक्सपेक्टेशन हाई होते. ‘The Lego Movie’ आणि ‘Spider-Man: Into the Spider-Verse’ सारखे धमाकेदार पिक्चर दिल्यानंतर इथे पण त्यांनी कमाल केलीये.
ही स्टोरी सायन्सने भरलेली असली तरी त्यांनी ती इतक्या सोप्या आणि एंटरटेनिंग पद्धतीने दाखवलीये की सामान्य माणसालाही सगळं कळतं. कुठे काय चाललंय ते?” अस कन्फ्युजन येत नाही.
पण खरी जादू कुठे आहे माहितेय? रायलंड आणि रॉकीच्या मैत्रीत एक माणूस आणि एक एलियन दोघं वेगवेगळ्या जगातून आलेले!तरीही त्यांची दोस्ती इतकी नैसर्गिक दाखवलीये की प्रेक्षक थेट त्यात गुंतून जातो.
हळूहळू a त्यांचा ट्रस्ट आणि केमिस्ट्री म्हणजे पिक्चरचा आत्मा!आणि सस्पेन्स? अरे शेवटचा भाग तर जणू एकदम थेटर सीट च्या टोकावर बसवतो. काय होणार पुढे? हे जाणून घ्यायला तुम्ही पूर्ण गुंतून जाता.
एकंदरीत दिग्दर्शन अस वाटत की जणू त्या अंतराळात आपण च रायलंड च्या जागी आहोत. आणि प्रत्यक्षात सगळ्या घटनांमध्ये सहभागी आहोत.
संगीत (Music)
म्युझिकबद्दल बोलायचं तर—Daniel Pemberton ने एकदम हटके काम केलंय. हे फक्त बॅकग्राउंड म्युझिक नाहीये, तर स्टोरीचा भाग आहे!
रॉकी हा एलियन म्युझिकल वेव्ह्समधून बोलतो आणि त्यासाठी जे साऊंड डिझाइन केलंय ना, ते एकदम युनिक आहे. स्पेसमधला एकाकीपणा, पृथ्वी वाचवायची घाई, आणि त्यातली भावना—सगळं म्युझिकमधून फील होतं. आणि क्लायमॅक्सला येणारं म्युझिक तर थेट हृदयाला भिडतं, अगदी डोळ्यात पाणी आणणारं म्युझिक आहे.
Project Hail Mary Movie Review in Marathi 2026 : रेटिंग्स (Ratings)
| प्लॅटफॉर्म | रेटिंग (Rating) | सारांश / रिव्ह्यू |
|---|---|---|
| IMDb | ८.७ / १० | प्रेक्षकांनी याला एक “मास्टरपीस” सायन्स-फिक्शन म्हटले आहे. |
| Rotten Tomatoes | ९४% (Fresh) | समीक्षकांनी दिग्दर्शन आणि रायन गॉसलींगच्या कामाची स्तुती केली आहे. |
| Metacritic | ८२ / १०० | जागतिक समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. |
| Google Users | ९६% Likes | ९६% गुगल वापरकर्त्यांना हा चित्रपट मनापासून आवडला आहे. |
| BookMyShow | ९.२ / १० | भारतीय प्रेक्षकांनी डबिंग आणि कथेला उत्तम प्रतिसाद दिला आहे. |
Project Hail Mary Movie Review in Marathi 2026 : गुड ऑर बॅड (Good Or Bad)
गुड (Good)
Project Hail Mary मध्ये रायलंड आणि रॉकीची दोस्ती एकदम जिगरी वाटते. कधी हसू तर कधी डोळ्यात पाणी आणते. सायन्स सोपं समजतं, थ्रिल कायम टेन्शनमध्ये ठेवतं, आणि स्पेसचे व्हिज्युअल्स डोळ्यांना भारी ट्रीट देतात.
बॅड (Bad)
Project Hail Mary मध्ये सुरुवातीचे फ्लॅशबॅक सीन काहींना थोडे स्लो वाटू शकतात. आणि ज्यांनी मूळ पुस्तक वाचलंय, त्यांना काही छोटे डिटेल्स चित्रपटात नाहीत असं जाणवू शकतं. तरीही एकूण अनुभव इंटरेस्टिंग आणि एंटरटेनिंगच राहतो.
Project Hail Mary Movie Review in Marathi 2026 : वॉच ऑर नॉट (Watch Or Not)
नक्कीच, मी तर म्हणेन हा चित्रपट अगदी पाहण्यायोग्य आहे. ज्यांना खरोखर अशा कन्सेप्ट आवडतात ज्यात अर्थपूर्ण विज्ञान आहे त्यांनी हा चित्रपट पाहिलाच पाहिजे.
Project Hail Mary Movie Review in Marathi 2026 : निष्कर्ष (Conclusion)
Project Hail Mary हा चित्रपट फक्त सायन्स नाही. रायलंड आणि रॉकीची जिगरी दोस्तीचा पण परिचय आहे Ryan Gosling चा दमदार अभिनय, आणि आशावादी मेसेज सगळं एकदम उत्तम प्रकारे दाखवलं गेल आहे. तसेच व्हिज्युअल्स आणि म्युझिकमुळे चित्रपटाला एक वेगळाच रंग चढतो.
FAQ –
1) Project Hail Mary movie ची कथा काय आहे?
उत्तर – हा चित्रपट एका सायंटिस्टची कथा दाखवते, जो स्पेसमध्ये जाऊन पृथ्वीला वाचवण्यासाठी मिशन पूर्ण करतो.
2) Project Hail Mary हा चित्रपट कोणत्या पुस्तकावर आधारित आहे?
उत्तर – हा चित्रपट Project Hail Mary या कादंबरीवर आधारित आहे, जी Andy Weir यांनी लिहिली आहे.
3) Project Hail Mary मध्ये मुख्य भूमिका कोणाची आहे?
उत्तर – या चित्रपटात मुख्य भूमिका Ryan Gosling यांनी साकारली आहे.
4) Project Hail Mary चित्रपट पाहावा का?
उत्तर – हो, जर तुम्हाला साय-फाय, स्पेस आणि इमोशनल स्टोरी आवडत असेल तर हा चित्रपट नक्की पाहावा.
5) Project Hail Mary मध्ये ‘Rocky’ कोण आहे?
उत्तर – ‘Rocky’ हा एक एलियन पात्र आहे जो मुख्य पात्राला मदत करतो आणि त्यांच्या मैत्रीमुळे कथा अजूनच इंटरेस्टिंग होते.