
Bhooth Bangla Movie Teaser Marathi Updates 2026 :(मुख्य कलाकार, सहाय्यक कलाकार, रिलीज डेट, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, संगीत, गायक, डायलॉग, टिझर, बजेट, भाषा, शूटिंग लोकेशन, OTT रिलीज प्लॅटफॉर्म, तिकीट बुकींग)
बॉलीवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार आणि महान दिग्दर्शक प्रियदर्शनी यांचा आगामी चित्रपट भूत बंगला याचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. अक्षय आणि प्रियदर्शनी ही जोडी तब्बल 14 वर्षानंतर Bhoot Bangla 2026 या चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत.
या आधी देखील या जोडीने रसिक प्रेक्षकांना भागम भाग, खट्टा मीठा, गरम मसाला, हेराफेरी, फिर हेरा फेरी यांसारखे अनेक विनोदी चित्रपट दिले आणि खळखळून हसवलं तर Bhoot Bangla 2026 हा चित्रपट देखील यापेक्षा अधिक रसिक प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा असणार आहे याबद्दल काहीच शंका नाही.
Bhooth Bangla Movie Teaser Marathi Updates 2026 : टिझर आणि विश्लेषण
Balaji Motion Pictures आणि Cape of Good Films यांच्या सहकार्याने निर्मित भूत बंगला या चित्रपटाचा टीझर म्हणजे या चित्रपटाची हलकीशी झलक आहे. टीझर पाहून असे समजते की हा चित्रपट horror-comedy मुव्ही आहे. भूल भुलैया सिनेमा पाहून जसे आपल्याला हसू आले आणि तितकीच भीती ही वाटली साधारण असा हा चित्रपट आहे.
टिझर पाहून असे समजते की, मंगलपुर नावाचे एक गाव आहे त्या गावामध्ये एक हाँटेड असा भूत बंगला आहे. जिथे अनेक रहस्य आणि गुपिते लपली आहेत. आणि या सगळ्यांचा मंगलपूर गावात होत असलेल्या विवाहांशी काही ना काही संबंध आहे. कारण “मालिक मंगलपूर गाव मे कोई शादी नही करता, वधूसूर आयेगा” असे काहीसे डायलॉग आपल्याला ऐकायला मिळतात. यावरून असे समजून येते की वधूसूर नावाच्या भुताचे त्या बंगल्यामध्ये नक्कीच काही ना काही अस्तित्व आहे आणि त्यामागे काहीतरी रहस्य देखील आहे.
आणि शेवटी वधूसूर या नावावरून पुढे विनोदी फंडे आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय कुमार, परेश रावल, राजपाल यादव या कलाकारांनी परत एकदा आपल्या विनोदी कलेचे सादरीकरण करून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तर असा हा हॉरर आणि कॉमेडी यांचे मिश्रण असलेला आणि प्रियदर्शनी दिग्दर्शित भूत बांगला हा चित्रपट नक्की प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल यात काही शंका नाही.
Bhooth Bangla Movie Teaser Marathi Updates 2026 : चित्रपटाबद्दल महिती
| तपशील (Details) | माहिती (Information) |
|---|---|
| चित्रपटाचे नाव | भूत बंगला (Bhooth Bangla) |
| दिग्दर्शक | प्रियदर्शन (Priyadarshan) |
| लेखक / पटकथा | रोहन शंकर, अभिलाष नायर आणि प्रियदर्शन |
| संवाद (Dialogues) | रोहन शंकर |
| निर्मिती | एकता कपूर, शोभा कपूर आणि अक्षय कुमार |
| कलाकारांची नावे | अक्षय कुमार, तब्बू, परेश रावल, राजपाल यादव, वामिका गब्बी |
| गायक / संगीत | प्रीतम (गाणी), अरमान मलिक, आरवन (Aarvan) |
| भाषा | हिंदी |
| रिलीज डेट | १० एप्रिल २०२६ |
| शूटिंग लोकेशन | मुंबई आणि हैदराबाद |
| बजेट | अद्याप जाहीर नाही |
| ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म | अद्याप जाहीर नाही |
| तिकीट बुकिंग | बुक माय शो लिंक |
Bhooth Bangla Movie Teaser Marathi Updates 2026 : अक्षय कुमार दिग्दर्शक प्रियदर्शन सर यांच्या बद्दल काय म्हणाला ?
अक्षय कुमार आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट करत म्हणाला की,“मॅजिक पुन्हा होणार!” तसेच दिग्दर्शक प्रियदर्शन सरांसोबत तब्बल १४ वर्षांनी पुन्हा काम करायला मिळणं त्याच्यासाठी खूप खास आहे.
“Dus ko denge das-tak, intezar karo tab tak… Let the fun begin! ” अस म्हणत अक्षय ने कॉमेडी अंदाजमध्ये कॅप्शन पोस्ट केले आहे.
Bhooth Bangla Movie Teaser Marathi Updates 2026 : अक्षय कुमार आणि विद्या बालन यांनी प्रियदर्शन सरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि भूत बंगला चित्रपटा निमित्त दिल्या विनोदी शुभेच्छा !!
हल्लीच अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री विद्या बालन यांनी दिग्दर्शक प्रियदर्शन सर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आगामी चित्रपट भूत बंगला निमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना अक्षय कुमार आणि विद्या बालन यांचा अनोखा अंदाज रसिका प्रेक्षकांना खूप आवडला. विद्या आणि अक्षय यांनी एक व्हिडिओ सादर करत एकदम हटक्या स्वरूपात प्रियदर्शन सरांना शुभेच्छा दिल्या.
FAQ-
1) ‘भूत बंगला’ चित्रपटात मुख्य भूमिका कोणाची आहे?
उत्तर – या चित्रपटात मुख्य भूमिका अक्षय कुमार साकारत आहे.
2) ‘भूत बंगला’ कोणत्या प्रकारचा चित्रपट आहे?
उत्तर – हा चित्रपट हॉरर- कॉमेडी प्रकारचा आहे.
3) ‘भूत बंगला’ चित्रपट कधी रिलीज होणार आहे?
उत्तर – हा चित्रपट १० एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
4) ‘भूत बंगला’ चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
उत्तर – प्रियदर्शन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
5) भूत बंगला’ चित्रपटात आणखी कोणते कलाकार आहेत?
उत्तर – परेश रावल, राजपाल यादव, दिवंगत अभिनेते असरानी सर, तब्बू, वामिका गब्बी यांसारखे सह कलाकार आहेत.