Boong Movie Review In Marathi 2026 : आईसाठी वडिलांचा शोध घेणाऱ्या मुलाची कथा

Boong Movie Review In Marathi 2026

Boong Movie Review Marathi 2026 : ( रिव्यू आणि माहिती, कथा, कलाकार, ट्रेलर, रिलीज डेट, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, बजेट, स्टार परफॉर्मन्स,OTT रिलीज प्लॅटफॉर्म, शूटिंग लोकेशन )

Boong Movie Review Marathi 2026 : “जगातलं सगळ्यात निस्वार्थ प्रेम जर कुणाचं असेल, तर ते आईचंच असतं.” लक्ष्मीप्रिया देवी दिग्दर्शित बुंग या चित्रपटाची कथा पण आपल्या सर्वांना हेच सांगते. BAFTA पुरस्काराने सन्मानित असलेला हा चित्रपट मणिपूर मधल्या एका मुलाचे आपल्या आई वरती असलेल प्रेम आणि तिला सुखी पाहण्यासाठी त्याची चाललेली धावपळ या सगळ्याचे चित्रण दर्शवते.

Boong Movie Review In Marathi 2026 : संपूर्ण माहिती आणि रिव्ह्यू

आईचं प्रेम निस्वार्थ, निखळ आणि आयुष्यभर साथ देणारं असतं, म्हणूनच मुलाच्या आयुष्यात आईचं स्थान कोणत्याही नात्याने भरून निघू शकत नाही. बुंग हा चित्रपट देखील अशाच एका शाळकरी मुलाच्या जीवनावर आहे ज्याचे वडील त्याला आणि त्याच्या आईला सोडून दुसऱ्या शहरात गेले असतात. आणि आईची ती आपल्या पतीसाठी व्याकुळता बघून हा शाळकरी मुलगा आपल्या वडिलांचा शोध घेण्यासाठी त्या अनोळखी शहरात जाण्याचे ठरवतो. आणि इथून सुरू होतो त्याच्या शोध मोहिमेचा प्रवास.

घटक माहिती
चित्रपटाचे नाव बूंग (Boong)
दिग्दर्शक लक्ष्मीप्रिया देवी (Laxmipriya Devi)
निर्माते रितेश सिधवानी, फरहान अख्तर, क्रिती मल्होत्रा, सुमित सक्सेना (एक्सेल एंटरटेनमेंट)
लेखक लक्ष्मीप्रिया देवी
प्रमुख कलाकार गुगुन किपगेन, मणिकंथा सिंग, बाला हिजाम, विक्रम कोचर
ट्रेलर रिलीज दिनांक १३ फेब्रुवारी २०२५
चित्रपट रिलीज दिनांक ६ मार्च २०२६ (थिएटर्समध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित)
भाषा मणिपुरी (सबटायटल्ससह उपलब्ध)
संगीत शशावत सचदेव (Shashwat Sachdev)
गायक मणिपुरी लोक कलाकार (Manipuri Folk Artists)
कालावधी (Duration) १ तास २९ मिनिटे
बजेट अंदाजे ५ ते १० कोटी रुपये
शूटिंग लोकेशन मणिपूर आणि भारत-म्यानमार सीमा (Moreh)
OTT प्लॅटफॉर्म अद्याप जाहीर नाही (अंदाजे Amazon Prime Video वर येण्याची शक्यता)
तिकीट बुकिंग BookMyShow वरून बुक करा

Boong Movie Review In Marathi 2026 : कलाकारांची नावे आणि पात्रे ( Cast & character Names )

कलाकार (Actor) पात्राचे नाव (Character Name)
गुगुन किपगेन (Gugun Kipgen) बूंग (Boong)
बाला हिजाम (Bala Hijam) मंदाकिनी (बूंगची आई)
मणिकंथा सिंग (Manikanta Singh) बाबू (बूंगचा मित्र)
अंगोम सनमटम (Angom Sanamatum) सुजाता
विक्रम कोचर (Vikram Kochhar) विशेष भूमिका

Boong Movie Review In Marathi 2026 : कथा(Story)

लक्ष्मीप्रिया देवी दिग्दर्शित बुंग हा चित्रपट लक्षवेधी चित्रपट आहे. अशा प्रकारचे कथालेखन हे एकदम विलक्षण आहे. कथेमध्ये एक मणिपूर मधला शाळकरी मुलगा दाखवला गेला आहे. ज्याच नाव बुंग आहे. तो आपली आई मंदाकिनी सोबत मणिपूर मध्ये राहत असतो. त्याचे वडील जॉयकुमार हे मोरेह नावाच्या एका शहरामध्ये काही कामानिमित्त जातात आणि परत कधीच घरी परतत नाही. बुंग आणि त्याची आई त्यांच्याशी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न करते परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही. शेवटी सर्व प्रयत्न हरुन बुंग आणि त्याची आई बुंग च्या वडिलांशिवाय जीवन जगायला सुरुवात करतात.

एके दिवशी बुंग च्या गावात याओसांग (होळी) चा सण असतो जो त् थाबल चोंगबा नावाचा एक पारंपरिक नृत्य प्रकार सादर करून साजरा केला जातो. ज्यामध्ये पती – पत्नी एकत्र नृत्य करतात. पण जॉय चे वडील नसल्यामुळे जॉय ची आई मंदाकिनी हिला एकटीनेच ते नृत्य करावे लागते. त्यामुळे ती उदास असते आणि जॉय हे सर्व बघून नाराज होतो व आपल्या वडिलांना आई साठी परत आणायचे असा निश्चय करतो. आणि शोध घेण्यासाठी मोरह शहराच्या दिशेने रवाना होतो. या शोध कार्यात जॉय अनेक मित्र-मैत्रिणींची, वडिलांच्या मित्रांची मदत घेतो. शिवाय त्याच्या या कार्यात अनेक अडथळे येतात. आणि विविध गोष्टींचे रहस्य देखील

तर जॉय च आपल्या वडिलांप्रती असलेली तळमळ आणि आपल्या आईवर असलेल प्रेम हे या धाडसा मागच त्याच बळ बनत. तर आता जॉय त्याच्या या मिशन मध्ये यशस्वी होतो का ? ते आपल्याला चित्रपट पाहूनच समजेल.

Boong Movie Review In Marathi 2026 : ट्रेलर(Trailer)

Boong Movie Review In Marathi 2026 : कलाकारांची कामगिरी (स्टार परफॉर्मन्स )

गुगून कीपगेगनने साकारलेलं पात्र बुंग हे या चित्रपटामध्ये मुख्य आकर्षण आहे. लहान वयात अस पात्र साकारून गुगून ने आपली परिपक्वता आणि अभिनयाची प्रतिभा सर्वांना दाखवली. तसेच त्याच्या आईचे पात्र साकारणारी अभिनेत्री बाला हिजाम हिने ही एक संघर्ष करणारी आई कशी असते? तिच्या वाटेत कीतीही अडचणी आल्या तरी ती एखाद्या मेरू पर्वताप्रमाणे कशी अचल उभी राहून मुलांचे संगोपन करते याचा सुंदर अभिनय बाला हिजाम ने केला आहे.

राजूच्या भूमिकेत अँगोम सनामातुम खूप छान दिसतो आणि त्याचं काम चित्रपटाला एक वेगळी मजा देतं. विक्रम कोचरने राजूच्या वडिलांची भूमिका अगदी सहज आणि प्रभावीपणे केली आहे. नृत्यांगनेच्या भूमिकेत जेनी खुराईही छान काम करते. तर नेमेटिया नंगबाम गोंडस जुलियानाच्या भूमिकेत रसिक प्रेक्षकांना अधिक आकर्षित करते.

मंदाकिनीची वहिनी आणि तिचा दारू पिणारा नवरा यांच्या भूमिकेत थौडाम मोधुबाला देवी आणि रमेश चंद्र सिंग यांनी खूप छान काम केलं आहे. ब्रजबिधू थौडाम सिंग यांनी साकारलेला प्रधान नावच कॅरेक्टर देखील चांगलच लक्षात राहतो. आणि हॉटेलची मालकीण म्हणून तोइजाम शिला देवी यांची छोटीशी भूमिका सुद्धा खूप मनमोहक वाटते.

Boong Movie Review In Marathi 2026 : चित्रपट पहावा की नाही ?

नक्कीच हा चित्रपट पाहण्याजोगा आहे. एका मुलाची आपल्या आई प्रति असलेली तळमळ आणि तिला खुश पाहण्यासाठी तिचा हरवलेला पती म्हणजेच (मुलाला आपले बाबा) हे कायम स्वरुपी आईला गिफ्ट म्हणून द्यायचे असतात. तर त्यासाठी त्याची मेहनत या सर्व बाबी पाहण्यासारख्या आहेत.

Boong Movie Review In Marathi 2026 : बूंग हा Farhan Akhtar यांच्या पाठिंब्याने प्रदर्शित झालेला मणिपुरी चित्रपट आहे का ?

हा चित्रपट याआधी गेल्या वर्षी १९ सप्टेंबरला भारतातील काही ठराविक शहरांमध्ये आणि PVR INOX च्या सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला होता. अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर यांनी शुक्रवारी सांगितले की लक्ष्मीप्रिया देवी दिग्दर्शित आणि BAFTA पुरस्कार जिंकलेला मणिपुरी चित्रपट ‘Boong’ ६ मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

FAQ-

1)Boong चित्रपट कशाबद्दल आहे?

उत्तर – हा चित्रपट एका लहान मुलाच्या प्रवासाची भावनिक गोष्ट सांगतो.

2) Boong चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले आहे?

उत्तर- लक्ष्मीप्रिया देवी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.

3) Boong चित्रपटाला कोणाचा पाठिंबा आहे?

उत्तर- या चित्रपटाला अभिनेता तसेच दिग्दर्शक फरान अख्तर याचा पाठिंबा आहे.

4)Boong चित्रपटाला कोणता मोठा पुरस्कार मिळाला आहे?

उत्तर- या चित्रपटाने BAFTA कडून सन्मान मिळवला आहे.

5) Boong चित्रपट कधी रिलीज झाला?

उत्तर- हा चित्रपट भारतात काही ठिकाणी आधी रिलीज झाला होता आणि नंतर पुन्हा थिएटरमध्ये ६ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झाला.

Leave a Comment