Dacoit: A Love Story Trailer Review In Marathi 2026 : (कलाकारांची नावे, पात्र, आणि भूमिका, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, डायलॉग राइटर, ट्रेलर रिलीज डेट, ट्रेलर ओव्हरव्ह्यू, अपेक्षित कथा, अपेक्षित परफॉर्मन्स, चित्रपट रिलीज डेट, गायक, संगीत, बजेट, भाषा, ड्युरेशन, शूटिंग, तिकीट बुकिंग, डायरेक्शन अँड म्युझिक, निष्कर्ष )
मित्रांनो, Dacoit: A Love Story हा पॅन-इंडिया ॲक्शन-थ्रिलर प्रेम, विश्वासघात आणि सूड यांची धगधगती कथा सांगतो. हरी (Adivi Sesh) आणि ज्युलिएट (Mrunal Thakur) हे माजी प्रेमी, एका कटकारस्थानामुळे वेगळे होतात. तुरुंगातून सुटल्यानंतर हरी सूडासाठी परततो, पण नियती त्यांना पुन्हा एकत्र आणते. नियो-वेस्टर्न स्टाईलमुळे चित्रपट अधिक रांगडा आणि थरारक वाटतो. चित्रपटाचा ट्रेलर २० मार्च २०२६ रोजी रिलीज झाला असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट १० एप्रिल २०२६ रोजी हिंदी आणि तेलगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Dacoit: A Love Story Trailer Review In Marathi 2026 : संपूर्ण माहिती
| तपशील | माहिती |
|---|---|
| चित्रपटाचे नाव | Dacoit: A Love Story |
| ट्रेलर रिलीज डेट | ५ एप्रिल २०२६ |
| चित्रपट रिलीज डेट | १० एप्रिल २०२६ |
| दिग्दर्शक | शनेल देव (Shaneil Deo) |
| निर्माते | Sesh Screen & AK Entertainments |
| कथालेखक | आदिवी शेष आणि शनेल देव |
| डायलॉग राईट | आदिवी शेष (मूळ तेलगू) |
| गायक व संगीतकार | श्रीचरण पाकला (Sricharan Pakala) |
| बजेट | अंदाजे ₹४० – ५० कोटी |
| भाषा | तेलगू आणि हिंदी |
| शूटिंग लोकेशन | हैदराबाद आणि उत्तर भारत |
| ड्युरेशन | अंदाजे २ तास ३० मिनिटे |
| तिकीट बुकिंग | BookMyShow वर बुक करा | Paytm वर बुक करा |
Dacoit: A Love Story Trailer Review In Marathi 2026 : कलाकारांची नावे ( Casting)
| कलाकाराचे नाव | भूमिकेचे नाव / स्वरूप |
|---|---|
| आदिवी शेष | हरी (मुख्य नायक – माजी दरोडेखोर) |
| मृणाल ठाकूर | ज्युलिएट (मुख्य नायिका – बंदूकधारी डकैत) |
| अनुराग कश्यप | इन्स्पेक्टर स्वामी (प्रमुख खलनायक) |
| प्रकाश राज | वरिष्ठ पोलीस अधिकारी / मार्गदर्शक |
| अतुल कुलकर्णी | शक्तिशाली स्थानिक राजकारणी / टोळीप्रमुख |
| झैन मेरी खान | ज्युलिएटची मैत्रीण / टोळी सदस्य |
| कामाक्षी भास्करला | ग्रामीण व्यक्तिरेखा (हरीच्या भूतकाळाशी संबंधित) |
| वैभव तत्ववादी | महत्त्वाची सहाय्यक भूमिका |
| सुनील | कथेला वळण देणारी विशेष भूमिका |
Dacoit: A Love Story Trailer Review In Marathi 2026 : ट्रेलर (Trailer)
Dacoit: A Love Story Trailer Review In Marathi 2026 : ट्रेलर ओव्हरव्ह्यू (Trailer Overview)
मित्रांनो, Dacoit: A Love Story चा ट्रेलर पाहताना असं वाटतं जसं कोणीतरी आपल्याला एक भन्नाट, थरारक गोष्ट सांगत आहे. सुरुवात होते हरी (Adivi Sesh) आणि ज्युलिएट (Mrunal Thakur) यांच्या प्रेमातून दोघांची केमिस्ट्री इतकी नैसर्गिक वाटते की ही एक सुंदर प्रेमकथा आहे असंच वाटतं. पण अचानक कथेला असा ट्विस्ट मिळतो की सगळंच उलटंपालटं होतं. जिच्यावर हरी जीवापाड प्रेम करतो, तीच त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा विश्वासघात करते. आणि इथूनच सुरू होतो सूडाचा प्रवास.
पुढे, तुरुंगातून बाहेर पडलेला हरी आता पूर्वीसारखा राहिलेला नसतो. त्याच्या डोळ्यांत प्रेमापेक्षा राग आणि वेदना जास्त दिसतात. दुसरीकडे, ज्युलिएटही आता तीच निरागस मुलगी नसून हातात बंदूक घेऊन उभी असलेली एक धाडसी डकैत बनलेली असते. परिस्थिती अशी येते की हे दोघं, एकमेकांचे शत्रू असूनही, एका मोठ्या दरोड्यासाठी पुन्हा एकत्र येतात. हा इथला moment जबरदस्त आहे मित्रांनो.
तसेच, बाकीच्या तांत्रिक गोष्टी पहिल्या तर, संपूर्ण ट्रेलरमध्ये वेस्टर्न स्टाईलचा जबरदस्त टच आहे. धुळीने भरलेलं वातावरण, घोड्यांच्या टापांचा आवाज, आणि बंदुकांची धडधड. त्यातच Anurag Kashyap यांची गडद एन्ट्री कथेचं रहस्य अजून वाढवते.
शिवाय बॅकग्राऊंड म्युझिक आणि सिनेमॅटोग्राफी प्रत्येक सीनला जिवंत करतात.एकूणच, ही केवळ ॲक्शन स्टोरी नाही तर प्रेम, विश्वासघात आणि सूड यांचा एक स्फोटक आणि भावनिक प्रवास आहे, जो शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
Dacoit: A Love Story Trailer Review In Marathi 2026 : अपेक्षित कथा ( Plot Guess)
मित्रांनो, याचा ट्रेलर पाहून मला अस वाटत की सुरुवात कदाचित हरी (Adivi Sesh) आणि ज्युलिएट (Mrunal Thakur) यांच्या प्रेमातून होते. दोघंही एकाच टोळीतील, थोडे रफ-टफ पण एकमेकांसाठी काहीही करायला तयार.
मग अचानक काहीतरी मोठं होतं. कदाचित एखादा दरोडा चुकतो किंवा पोलिसांचा सापळा लागतो. आणि हरी पकडला जातो. इथेच ट्विस्टनिर्माण होतो कारण, हरीला वाटतं की ज्युलिएटनेच त्याला फसवलं. आता खरंच तिने केलं का, की कोणीतरी गेम खेळला. हे अजून सस्पेन्स आहे. त्यानंतर, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हरी पूर्ण बदललेला असतो. त्याच्या डोक्यात फक्त सूड आणि टार्गेट म्हणजे ज्युलिएट.
पण स्टोरी इथे सरळ जात नाही. कदाचित Anurag Kashyap चा कॅरेक्टर जो पोलिस किंवा माफिया असू शकतो तो दोघांनाही संपवायला निघालेला असतो. आणि मग जबरदस्तीने हे दोघं पुन्हा एकत्र येतात. एकमेकांवर विश्वास नाही, पण एकत्र काम करणं भाग पडतं. कदाचित एका शेवटच्या मोठ्या दरोड्यासाठी असावं.
Overall, मला तर असं वाटतं शेवटी मोठा रिव्हील होईल. ज्युलिएट खरंच दोषी नसेल, तिच्यामागे काहीतरी मजबुरी असेल. आणि तिथेच इमोशन + ॲक्शन एकदम पीकवर जाईल!
मित्रांनो या guessing वर तुमचं काय मत आहे ? नक्की comment box मध्ये कळवा. 🙏
Dacoit: A Love Story Trailer Review In Marathi 2026 : अपेक्षित अभिनय (Performance Expectation)
Dacoit: A Love Story बद्दल बोलायचं झालं, तर मला असं वाटतं की यावेळी फक्त स्टोरी नाही तर actors पण पूर्ण जोर लावणार आहेत.
बघा Adivi Sesh आहे ना तो नेहमीच solid acting करतो, पण यावेळी तो थोडा वेगळा दिसतोय. म्हणजे romantic lover आणि full angry, revenge mode मधला डकैत दोन्ही shades तो कसा balance करतो, ते बघायला मजा येणार.
आणि Mrunal Thakur बद्दल बोलायचं तर honestly, ती biggest surprise वाटतेय. आपण तिला आतापर्यंत soft roles मध्ये पाहिलं, पण इथे ती gun हातात घेऊन full fearless दिसतेय. आणि मला वाटतं ती फक्त heroine म्हणून नाही, तर story drive करणारी strong character असेल ज्यामुळे हरीचं आयुष्यच उलटलं.
मग येतो Anurag Kashyap हा माणूस screen वर आला की vibe च बदलते. तो ओरडणारा villain नसून शांतपणे घाबरवणारा type असेल असं वाटतंय जास्त dangerous! आणि side ला Atul Kulkarni आणि Prakash Raj सारखे experienced actors आहेत, त्यामुळे scenes अजून heavy होतील.
एकंदरीत, मला असं वाटतं हा movie action पेक्षा acting वर जास्त टिकणार… especially हरी आणि ज्युलिएटचा emotional clash तोच खरी highlight असणार.
Dacoit: A Love Story Trailer Review In Marathi 2026 : दिग्दर्शन आणि म्युझिक (Direction & Muisc)
दिग्दर्शन (Direction)
Dacoit: A Love Story बद्दल एक गोष्ट क्लियर वाटते की शनेल देव हे फक्त director नाही, तर पूर्ण visual storyteller आहे. बघ ना, ज्यांनी Kshanam आणि Goodachari सारख्या फिल्म्समध्ये cinematography केली, ते जेव्हा स्वतः direction करतात तेव्हा expectation आपोआप वाढतात.
ट्रेलर पाहताना असं जाणवतं की प्रत्येक frame खूप raw आणि real आहे. जसं एखादं painting जिवंत झालंय. त्याने जो neo western touch दिलाय ना, तो खूप unique वाटतो. माती, धूळ, घोडे आणि intense action यांचं perfect mix.
पण खास गोष्ट म्हणजे तो फक्त action दाखवत नाही, तर characters च्या emotions वरही focus करतो. काही scenes मध्ये silence वापरून tension build करणं, आणि अचानक action explode करणं हा त्याचा style खूप engaging वाटतो. honestly, त्याचं direction movie ला एक वेगळाच level देऊ शकतं.
म्युझिक (Muisc)
Music बद्दल बोलायचं तर, Sricharan Pakala नाव आलं की expectations आपोआप high जातात, कारण त्यांनी Major आणि HIT: The First Case सारख्या फिल्म्समध्ये already solid काम केलंय. या movie च्या trailer मध्ये जे BGM ऐकायला मिळतं, ते खूप dark आणि intense आहे. जसं की story मध्ये चाललेला धोका आणि tension आपल्याला feel होतं.
thriller movie मध्ये background score खूप महत्त्वाचा असतो, आणि इथे तो एक hidden character सारखा काम करताना दिसतो. त्याच वेळी, ही love story पण आहे, त्यामुळे काही soulful आणि emotional songs पण असतील असं वाटतं. action scenes मध्ये heavy beats आणि romantic moments मध्ये soft melodies हा balance तो छान handle करतो. एकंदरीत, त्याचं music movie चा mood set करून प्रेक्षकांना त्या world मध्ये fully immerse करणार आहे.
Dacoit: A Love Story Trailer Review In Marathi 2026 : निष्कर्ष (Conclusion)
Dacoit: A Love Story हा फक्त ॲक्शन किंवा प्रेमकथा नाही, तर भावना, विश्वासघात आणि सूड यांचा जबरदस्त संगम आहे. Adivi Sesh आणि Mrunal Thakur यांची केमिस्ट्री आणि त्यांच्यातला संघर्ष चित्रपटाचा मुख्य आधार ठरणार आहे. Shaneil Deo यांचे दमदार दिग्दर्शन आणि Sricharan Pakala यांचे प्रभावी संगीत संपूर्ण अनुभव अधिक थरारक बनवेल. एकूणच, हा चित्रपट प्रेम आणि सूडाचा असा प्रवास दाखवेल, जो प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.
FAQ –
1) ‘Dacoit: A Love Story’ चित्रपटाची कथा काय आहे?
उत्तर – हा चित्रपट प्रेम, विश्वासघात आणि सूड याभोवती फिरतो, जिथे दोन माजी प्रेमी पुन्हा एकत्र येऊन धोकादायक परिस्थितीचा सामना करतात.
2) ‘Dacoit: A Love Story’ मध्ये मुख्य कलाकार कोण आहेत?
उत्तर – या चित्रपटात आदिवी शेष, मृणाल ठाकूर, अनुराग कश्यप, प्रकाश राज आणि अतुल कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहेत.
3) ‘Dacoit: A Love Story’ चित्रपट कधी रिलीज होणार आहे?
उत्तर – हा चित्रपट १० एप्रिल २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
4) ‘Dacoit: A Love Story’ कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध असेल?
उत्तर – हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
5) ‘Dacoit: A Love Story’ खास का आहे?
उत्तर – यात नियो-वेस्टर्न स्टाईल, दमदार ॲक्शन, आणि भावनिक कथा यांचा अनोखा मेळ आहे, जो प्रेक्षकांना वेगळा अनुभव देतो.