Dhurandar 2 Box Office Collection In Marathi 2026 : रणवीर सिंग दिग्दर्शक आदित्य धर यांचा धुरंदर २ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये जबरदस्त चर्चेत आहे. आणि त्याची हवा वेगळीच तयार झाली आहे. एक आर्मी मॅन आपल्या देशासाठी गुप्तहेर बनून कुठच्या पातळीपर्यंत सेवा देऊ शकतो ते आपल्याला धुरंदर च्या पहिल्या भागापासून समजत आले आहे.
तसेच या पहिल्या भागानंतर लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या, आणि या सिक्वेलमध्ये त्या पूर्ण होतील का याची उत्सुकता देशील सगळ्यांनाच आहे. ट्रेलरमधूनच चित्रपटाची स्टाईल, दमदार ॲक्शन आणि थोडा सस्पेन्स याची झलक मिळते. त्यामुळे हा फक्त एक साधा ॲक्शन चित्रपट नसून, त्यात देश भावना, ड्रामा आणि ट्विस्ट्सही पाहायला मिळतील असं वाटतं. सध्या सोशल मीडियावरही याची खूप चर्चा चालू आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये अजूनच क्रेझ वाढली आहे. एकूणच, धुरंदर २ हा थिएटरमध्ये जाऊन अनुभव घ्यावा असा एंटरटेनमेंट पॅकेज ठरला आहे.

Dhurandar 2 Box Office Collection In Marathi 2026 : रेकॉर्ड ब्रेकिंग सुरुवात (Record Breaking Start)
पहिल्या दिवसाची कमाई
मित्रांनो या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अक्षरशा income च्या बाबतीत box Office वर धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी ₹१०२.५५ कोटी (Net India) इतकी दमदार कमाई नोंदवत बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक सुरुवात केली. या मोठ्या ओपनिंगमुळे या चित्रपटाने आधीच्या अनेक चित्रपटांच्या रेकॉर्ड्सना मागे टाकत आपला दबदबा बनवला आहे. तसेच प्रेक्षकांमध्ये आपली मजबूत पकड देखील बनवली. देशभरात मिळालेला जबरदस्त प्रेम, प्रतिसाद, भरगच्च थिएटर आणि मोठ्या प्रमाणातील स्क्रीन यांचा या कमाईत मोठा व महत्त्वाचा वाटा आहे.
| धुरंधर २: पहिल्या दिवसाची कमाई (Day 1) | |
|---|---|
| हिंदी व्हर्जन (Hindi) | ₹९९.१० कोटी |
| दाक्षिणात्य भाषा (South) | ₹३.४५ कोटी |
| एकूण भारत नेट (Total Net) | ₹१०२.५५ कोटी |
Dhurandar 2 या चित्रपटाबद्दल संपूर्ण माहिती येथे वाचा.
ॲडव्हान्स बुकिंग मधून कमाई
मित्रांनो इथे तर या चित्रपटाने अगदी कहरच केला. चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच ₹४४ कोटींची अॅडव्हान्स कमाई करत प्रचंड उत्सुकतेचं चित्र स्पष्ट केलं. नवे नवे तर अस वाटतं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये धुरंदर १ आणि धुरंदर २ यांनी आपलं एक अलगच ब्रॅण्डिंग तयारी केली. इतक्या मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स बुकिंग होणं हे चित्रपटाच्या लोकप्रियतेचा च पुरावा आहे. ऑनलाइन तिकिट बुकिंग आणि चाहत्यांचा वाढलेला उत्साह यामुळे रिलीजपूर्वीच चित्रपटाने मजबूत सुरुवात केली.
| धुरंधर २: ॲडव्हान्स बुकिंग आणि प्रिव्ह्यू रिपोर्ट | |
|---|---|
| ॲडव्हान्स बुकिंग (प्रदर्शनापूर्वी) | ₹८०.४० कोटी |
| पेड प्रिव्ह्यू (१८ मार्च) | ₹४३.५० कोटी |
Dhurandar 2 Box Office Collection In Marathi 2026 : पहिल्या दिवसाची जागतिक कमाई (World Wide Income)
मित्रांनो धुरंदर २ चित्रपटाने फक्त भारतातच नाही पण भारताबाहेर म्हणजेच जागतिक स्तरावर देखील आपल्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा डंका वाजवला. चित्रपटाने अगदी भन्नाट सुरुवात करत या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरातून ₹२३६.१० कोटी (Gross) कमावत जबरदस्त इतिहास घडवला. एवढा मोठा आकडा पाहून सगळेच थक्क झालेत. फक्त भारतातच नाही, तर परदेशातही चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. थिएटरमध्ये हाऊसफुल शो, प्रेक्षकांची क्रेझ आणि सोशल मीडियावर चाललेला जबरदस्त buzz यामुळे हा आकडा शक्य झाला आहे.
| धुरंधर २: जागतिक बॉक्स ऑफिस (Worldwide Gross) | |
|---|---|
| भारत ग्रॉस कलेक्शन (India Gross) | ₹१७२.१० कोटी |
| परदेशातील कमाई (Overseas) | ₹६४ कोटी |
| एकूण जागतिक कमाई | ₹२३६.१० कोटी |
सर्वात खास गोष्ट म्हणजे हिंदी व्हर्जनसाठी ही आजवरची सर्वात मोठी जागतिक ओपनिंग ठरली आहे. याने Jawan आणि Pathaan सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्डसुद्धा मागे टाकलेत. एकूणच, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एन्ट्री करत पुढे अजून मोठे विक्रम करण्याची चिन्हे दिसत आहे.
Dhurandar 2 Box Office Collection In Marathi 2026 : पहिल्या दिवसाची परदेशातील कामगिरी
जगभरातही या चित्रपटाने भारी धुमाकूळ घातलाय. उत्तर अमेरिका (USA & Canada) मध्येच तब्बल 1.44 दशलक्ष डॉलर्सची कमाई झाली, आणि Ranveer Singh ची तिथली क्रेझ यात स्पष्ट दिसून आली.
यूके आणि युरोपमध्ये प्रेक्षकांनी चित्रपटाच्या तांत्रिक दर्जा आणि अॅक्शनला जोरदार प्रतिसाद देत फाईव्ह स्टार रिव्ह्यूज दिले.
UAE मध्ये सुद्धा चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला, ज्यामागे Sanjay Dutt आणि R. Madhavan यांची लोकप्रियता मोठा फॅक्टर ठरली.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही चित्रपट टॉप 5 मध्ये पोहोचला, त्यामुळे एकंदरीत परदेशातही या सिनेमाचा जलवा तितकाच जबरदस्त दिसतोय.
Dhurandar 2 Box Office Collection In Marathi 2026 : दुसऱ्या दिवसाची कमाई
भारतातील कलेक्शन
Dhurandhar 2 चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुरळाच केलाय! Ranveer Singh चा हा पिक्चर पहिल्या दिवशीच तुफान कमाई करून गेला, आणि दुसऱ्या दिवशी पण काही कमी नाही केल बरं का.
शुक्रवारी पण पब्लिकचा तुफान रिस्पॉन्स मिळाला, आणि अंदाजे ७० ते ९० कोटींच्या आसपास कलेक्शन केलं. म्हणजे काय तर, फक्त दोन दिवसांतच थेट २०० कोटींचा आकडा पार केलाय या पिक्चरन.
परदेशातील कलेक्शन
परदेशात पण आपला पिक्चर फुल राडा घालतोय मित्रांनो ! Dhurandhar 2 चा दुसऱ्या दिवशीचा परदेशातला कलेक्शन पण भारीच झालाय. साधारण २१ ते २५ कोटींच्या आसपास गल्ला जमवला गेला आहे.
दोन दिवसांचा एकूण परदेशातला कलेक्शन बघितलास तर थेट ६४ कोटींवर पोहोचला हाय. यात पहिल्या दिवसाची कमाई आणि पेड प्रिव्ह्यूचे जवळपास ४२ कोटी पण धरलेत बरं का.
आणि खास म्हणजे United States, United Kingdom आणि Australia मध्ये पिक्चरला जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय.
२ दिवसांची बॉक्स ऑफिस आकडेवारी
| क्षेत्र (Region) | दुसऱ्या दिवसाची कमाई (Day 2) | दोन दिवसांची एकूण कमाई (Total 2 Days) |
|---|---|---|
| भारत (India Net) | ₹७० – ९० कोटी | ₹२१० – २२६ कोटी |
| परदेश (Overseas Gross) | ₹२१ – २५ कोटी | ₹६४ – ७५ कोटी |
| जगभरात (Worldwide Gross) | ₹९० – ११५ कोटी | ₹३३० – ३७० कोटी |
Dhurandar 2 Box Office Collection In Marathi 2026 : दिवस तिसरा (Day 3)
“Dhurandhar 2” ने तर बॉक्स ऑफिसवर तिसऱ्याच दिवशी सुद्धा कहर केलाय. शनिवारी सिनेमा एकदम जोरात चालला आणि भारतातच जवळपास ₹११३ कोटी नेट कमावले. दुसऱ्या दिवसाच्या तुलनेत तब्बल ४०% वाढ झाली, म्हणजे लोकांनी थिएटरमध्ये भारी गर्दी केली.
फक्त ३ दिवसांतच सिनेमा ₹३३९ कोटींवर पोचला, आणि जगभरात तर थेट ₹५०० कोटी पार केलेत. एवढ्या कमी वेळात इतकी कमाई म्हणजे भारीच गोष्ट आहे. सगळ्यात मोठं म्हणजे, या सिनेमाने “Pathaan”, “Jawan” आणि “Animal” सारख्या मोठ्या सिनेमांचे रेकॉर्ड पण मोडलेत. थोडक्यात, सिनेमा सध्या full जोशात चाललाय 🔥
Dhurandhar 2 – Day 3 Box Office Collection
| विभाग | तपशील |
|---|---|
| तिसऱ्या दिवसाची कमाई (India Net) | ₹११३ कोटी |
| वाढ (Day 2 च्या तुलनेत) | सुमारे ४०% वाढ |
| एकूण ३ दिवसांची कमाई (India Net) | ₹३३९.२७ कोटी |
| जागतिक कमाई (Worldwide Gross) | ₹५०१.०४ कोटी |
| रेकॉर्ड | Pathaan, Jawan, Animal यांचे रेकॉर्ड मोडले |
Dhurandar 2 Box Office Collection In Marathi 2026 : दिवस चौथा (Day 4)
धुरंदर २ ने या शनिवारी आणि रविवारी जवळजवळ 100 कोटींचा आकडा दोन दिवसातच पार केला. आणि हे प्रमाण आहे चित्रपट फुल फॉर्म मध्ये चालू असल्याचे. मित्रांनो चार दिवसात या चित्रपटाने 700 कोटींचा आकडा पार केला. आणि असं समजलं की सनी देओल च्या गदर 2 या चित्रपटाला मागे टाकत धुरंदरने अवघ्या चार दिवसातच नवीन रेकॉर्ड बनवला.
धुरंधर 2 – चौथा दिवस कलेक्शन
“जिथं पब्लिक खुश, तिथं पिक्चर हिट ठरलेलं!” 😎🔥
| विभाग | कमाई |
|---|---|
| भारत (India Net) | ₹११४.८५ कोटी |
| भारत (India Gross) | ₹१३५.१५ कोटी |
| परदेश (Overseas Gross – ४ दिवस) | ₹१४९.३५ कोटी |
| जागतिक एकूण (Worldwide Total) | ₹६९१.३२ कोटी |
Dhurandar 2 Box Office Collection In Marathi 2026 : दिवस ५ वा (Day 5)
| कलेक्शन प्रकार | रक्कम (₹) |
|---|---|
| पाचव्या दिवसाची कमाई (भारत – नेट) | सुमारे ₹६५ कोटी |
| एकूण भारतीय नेट कलेक्शन | सुमारे ₹५१९.१२ कोटी |
| एकूण भारतीय ग्रॉस कलेक्शन | सुमारे ₹६१९.७६ कोटी |
| जागतिक (Worldwide) एकूण ग्रॉस कलेक्शन | सुमारे ₹८२९.७६ कोटी |
विकेट नंतर सोमवारी चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये थोडीशी घसरण दिसली, जवळपास ४४% ने कमाई कमी झाली. पण तरीही पिक्चरने दम दाखवत भारतात ५०० कोटींचा मोठा टप्पा पार केला, म्हणजे अजूनही गेम स्ट्रॉंग आहे.
जागतिक स्तरावर:ओव्हरसीज मार्केटमध्ये पण चित्रपट जोरात चाललाय. आतापर्यंत परदेशातून साधारण ₹२१० कोटींची कमाई जमवलीय, म्हणजे वर्ल्डवाईड लेव्हलवरही धुमाकूळ आहे.
या चित्रपटाने मोठमोठ्या फिल्म्सचे रेकॉर्ड तोडलेत जसं की KGF Chapter 2, Pushpa 2: The Rule आणि 2.0. म्हणजे हा पिक्चर वेगळ्याच लेव्हलवर चाललाय.
पाचव्या दिवशी हिंदीमध्ये सुमारे ४८.४४% थिएटर ऑक्युपन्सी होती, म्हणजे अजूनही थिएटरमध्ये लोकांची गर्दी चांगलीच टिकून आहे.
Dhurandar 2 Box Office Collection In Marathi 2026 : दिवस ६ वा (Day ६)
| तपशील (Details) | ६ व्या दिवसाची कमाई (Day 6) | एकूण ६ दिवसांची कमाई (Total 6 Days) |
|---|---|---|
| भारत (India Net) | ₹ ५६.६० कोटी | ₹ ५७५.७२ कोटी |
| परदेश (Overseas Gross) | ₹ १८.४३ कोटी | ₹ २५०.०० कोटी |
| एकूण जागतिक कमाई (Worldwide Gross) | ₹ ७५.०३ कोटी | ₹ ९३७.४९ कोटी |
नोंद: ही आकडेवारी मीडिया रिपोर्ट्सवर आधारित प्राथमिक माहिती आहे.
Dhurandar 2 Box Office Collection In Marathi 2026 : दिवस ७ वा (Day 7)
| क्षेत्र (Region) | कमाई (Amount in ₹) |
|---|---|
| भारत निव्वळ (India Net) | ₹४८.७५ कोटी |
| भारत एकूण (India Gross) | ₹५७.५० कोटी |
| जगभरात एकूण (Worldwide Gross) | ₹१,००६.५० कोटी (एकूण टप्पा) |
Dhurandar 2 Box Office Collection In Marathi 2026 : दिवस ८ वा (Day 8)
| क्षेत्र (Region) | कमाई (Amount in ₹) |
|---|---|
| भारत निव्वळ (India Net) | ₹४९.७० कोटी |
| भारत एकूण (India Gross) | ₹५९.०० कोटी |
| जगभरात एकूण (Worldwide Gross) | ₹१,०६७.२४ कोटी (एकूण टप्पा) |
Dhurandar 2 Box Office Collection In Marathi 2026 : ८ दिवसांची एकूण कमाई (Total 8 Days Income)
| कॅटेगरी (Category) | एकूण कमाई (Total Amount in ₹) |
|---|---|
| भारत निव्वळ (India Net Total) | ₹६७४.१७ कोटी |
| भारत एकूण (India Gross Total) | ₹८०५.३२ कोटी |
| परदेशातील कमाई (Overseas Gross) | ₹२६१.९२ कोटी |
| जगभरात एकूण (Worldwide Gross Total) | ₹१,०६७.२४ कोटी |
Dhurandar 2 Box Office Collection In Marathi 2026 : दिवस 9 वा आणि १० वा ( Day 9th & 10th)
| दिवस (तारीख) | भारत नेट कलेक्शन (India Net) | परदेशातील कमाई (Overseas) | जागतिक एकूण कमाई (World Gross) |
|---|---|---|---|
| ९ वा दिवस (२७ मार्च) | ₹४१.७५ कोटी | ₹१७.७५ कोटी | ₹५९.५० कोटी |
| १० वा दिवस (२८ मार्च) | ₹६२.३५ कोटी | ₹२५.५० कोटी | ₹८७.८५ कोटी |
| एकूण १० दिवसांची कमाई | ₹८३० कोटी + | ₹३७० कोटी + | ₹१,२०० कोटी + |
Dhurandar 2 Box Office Collection In Marathi 2026 : दिवस ११ ते १३(Day 11 to 13)
| दिवस | तारीख | भारत (Net) | भारत (Gross) | जागतिक (Worldwide) |
|---|---|---|---|---|
| ११ वा दिवस | २९ मार्च (रवि) | ₹६८.१० कोटी | ₹८१.०५ कोटी | ₹१,३५५.९२ कोटी |
| १२ वा दिवस | ३० मार्च (सोम) | ₹२५.३० कोटी | ₹३०.२८ कोटी | ₹१,३९२.२३ कोटी |
| १३ वा दिवस | ३१ मार्च (मंगळ) | ₹२७.७५ कोटी | ₹३३.२२ कोटी | ₹१,४३५.४१ कोटी |