Dhurandhar 2 Trailer Review In Marathi 2026: रणवीर-सिंग च्या बदल्याचा द बिस्ट मोड ऑन !!

Dhurandhar 2 Trailer Review In Marathi 2026: रणवीरची बीस्ट एनर्जी आणि बदल्या घेण्याची भावना पाहून असे वाटते की, जणू पाकिस्तान चा कर्दनकाळ च जवळ आलाय. अनेकदा हा ट्रेलर अधून मधून पाहण्याची इच्छा होते.

Dhurandhar 2 Trailer Review In Marathi 2026

मित्रांनो आदित्य धर यांच्या धुरंदर २ या चित्रपटाचा ट्रेलर ७ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झाला. धुरंदर २ मध्ये सामन्यत: रणवीर सिंग हमझा अली मजारी कसा बनतो? हा सर्व प्रवास दाखवण्यात येईल आणि रेहमान डकाईत च्या हत्येनंतर ल्यारीवर नक्की कोणाच वर्चस्व होणार? या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातील. त्यामुळे धुरंदर च्या भरघोस यशानंतर धुरंदर २ हा चित्रपट देखील नक्कीच सिनेमागृह गाजवणार यात शंका नाही.

Dhurandhar 2 Trailer Review In Marathi 2026: ट्रेलरची प्राथमिक माहिती

घटक तपशील
ट्रेलर रिलीज तारीख ७ मार्च २०२६
ट्रेलरची लांबी ३ मिनिटे ७ सेकंद
मुख्य कलाकार रणवीर सिंह, संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल
दिग्दर्शक आदित्य धर
प्रमुख आकर्षण हाय-ऑक्टेन ॲक्शन आणि रणवीर सिंहचा गँगस्टर लूक
चित्रपट रिलीज तारीख १९ मार्च २०२६

Dhurandhar 2 Trailer Review In Marathi 2026: ट्रेलर व्हिडिओ

Dhurandhar 2 Trailer Review In Marathi 2026: Trailer Overview (विश्लेषण)

मित्रांनो, जर तुम्ही पहिला भाग पाहिला असेल, तर समजा… तो फक्त झटका होता! पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कारण Dhurandhar 2 चा ट्रेलर पाहून लक्षात येतं – आता गोष्टींची पातळीच बदलणार आहे. रणवीर सिंग इतका धमाल आहे की पाहून थरकाप येतो, आणि त्याचा बदला इतका घातक की स्क्रीनवरून नजर हटवणं अवघड आहे.

कथा सुरू होते जिथून पहिला भाग संपला होता, आणि आपल्याला जसकीरत सिंग रांगीच्या भूतकाळात घेऊन जाते – आधी तो हमजा अली मंसारी होता. ट्रेलरमधील सीन्स इतके धक्कादायक आहेत की इतकं काही पाहून तुम्हाला लगेच आयुष्यभरचा थरार अनुभवायला मिळेल असं वाटतं.ट्रेलरमध्ये प्रत्येक पात्राला छान ओळख मिळते – संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी, दानीश पंडोर, सारा अर्जुन आणि हो, आर. माधवन एका फ्रेममध्येच दिसतो – धोकादायक, sharp आणि बदला घेण्यासाठी तयार.

थोडक्यात सांगायचं, हा ट्रेलर फक्त एक सिक्वेल नाही, हा एक युद्धाची घोषणा आहे. रणवीरचा बीस्ट मोड आणि त्याचा बदला पाहून तुम्हाला देखील आपल्या देशाच्य शत्रू विरुद्ध एवढाच व्हायलेंट व्हायची इच्छा होईल. आणि हो ट्रेलर एकदम रावस आहे.

Dhurandhar 2 Trailer Review In Marathi 2026: कलाकारांचा अपेक्षित अभिनय Cast performance (Expectation)

मित्रांनो, हा ट्रेलर पाहून एकच गोष्ट लक्षात येते – कलाकारांनी दमदार काम केलंय! रणवीर सिंग पूर्णपणे अग्रेशन आणि बीस्ट मोडमध्ये आहे. तो स्क्रीनवर येतो तेव्हा लगेचच सगळे लक्ष त्याच्याकडे वळते. त्याची बोलण्याची स्टाईल, चालण्याची स्टाईल, attitude या सर्व गोष्टी त्याचा त्याच्या कॅरेक्टर प्रति असलेला समर्पण आणि प्रेम दर्शवते. रणवीर चा बदला इतका घातक आणि तिखट आहे की थरकाप येतो! जो नायक आधी फक्त एक छान हँडसमली दिसणारा होता, तो आता mission-ready आणि युद्धासाठी सज्ज असलेली जणू एक तलवार च वाटते.

आर. माधवनचा अंदाज पाहायला खूप मजा येते. एखाद मिशन पूर्ण करण्यासाठी एक तरी मास्टर माईंड आचार्य चाणक्यांसारखा असावा अशी भूमिका माधवन ने केली आहे. त्याचा अभिनय तुमच्यात भीती आणि उत्सुकता दोन्ही निर्माण करतो. धोकादायक, sharp आणि बदला घेण्याची भूक त्याच्या डोळ्यातून जाणवते.

तसेच संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी, दानीश पंडोर, सारा अर्जुन या प्रत्येक पात्राने छोट्या वेळेत पण जोरदार छाप सोडली आहे. त्यांच्या मिक्समुळे ट्रेलर अजूनच रोचक आणि थरारक झाला आहे.

थोडक्यात सर्वच कलाकारांनी आपली भूमिका चोख बजावली आहे. त्यांचा अभिनय पाहून खरच आपले गुप्तहेर खात्याचं अधिकारी आणि एजंट असेच असतील अशी भावना मनात उत्पन्न होते.

Dhurandhar 2 Trailer Review In Marathi 2026: अपेक्षित कथा (Plot guess)

जसकीरत सिंग हा हमझा अली मजारी कसा बनतो ? हा सर्व प्रवास कथित केला जाऊ शकतो. तसेच रेहमान डकेत च्या हत्येनंतर ल्यारीवर कोण कब्जा मिळवेल? या अनुषंगाने गँग वॉर भडकण्याची जास्त शक्यता वाटते. तसेच गोष्टी मध्ये अजून अनपेक्षित बदल केले जाऊ शकतात.

Dhurandhar 2 Trailer Review In Marathi 2026: म्युझिक (Music & Back ground song)

शाश्वत सचदेव यांनी धुरंदर २ या सिनेमाचा म्युझिक आणि बॅकग्राऊंड हे अक्षरशः अंगावर शहारे आणणार आहे. काही ठिकाणी म्युझिक ऐकून थोड भयावह देखील वाटतं. तसेच जास्त प्रमाणात म्युझिक आणि बॅकग्राऊंड सांग्स हे हिंसक आणि चतुर वाटत.

Leave a Comment