Made In Korea Tamil Movie Review In Marathi 2026 : ( कथा, कलाकार, दिग्दर्शक, निर्मिती, लेखक, गायक, संगीत, बजेट, गुड ऑर बॅड, स्टार परफॉर्मन्स, ड्युरेशन, OTT रिलीज प्लॅटफॉर्म, तिकीट बुकींग, शूटिंग लोकेशन )

Made In Korea Tamil Movie Review In Marathi 2026 : दिग्दर्शक Ra Karthik यांचा Made In Korea या सिनेमाने अगदी वेळेवर entry मारली आहे. संपुर्ण भारतामध्ये कोरियन संस्कृती विषयी craze वाढत असताना Made In Korea नावाचा चित्रपट लाँच करणे म्हणजे हे एक अभ्यासू दिग्दर्शन आणि व्यक्तिमत्व दर्शवते.
१२ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट थेटरिकल रिलीज नसून Netflix या OTT प्लॅटफॉर्म रिलीज झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात देखील हा चित्रपट पाहण्यासाठी आणि कोरियन संस्कृती समजून घेण्यासाठी एक वेगळीच उत्सुकता आहे.
Made In Korea Tamil Movie Review In Marathi 2026 : संपूर्ण माहिती
| चित्रपटाचा संपूर्ण तपशील: मेड इन कोरिया | |
|---|---|
| चित्रपटाचे नाव | मेड इन कोरिया (Made in Korea) |
| दिग्दर्शक | रा कार्तिक (Ra Karthik) |
| निर्माता | ए. सुबास्करन (Lyca Productions) |
| कथा व संवाद लेखक | रा कार्तिक |
| संगीत | गोपी सुंदर |
| भाषा | तामिळ (डब उपलब्ध) |
| कालावधी (Duration) | १ तास ५२ मिनिटे |
| बजेट | अंदाजे १५ – २० कोटी रुपये |
| ट्रेलर रिलीज डेट | २८ फेब्रुवारी २०२६ |
| चित्रपट रिलीज डेट | १२ मार्च २०२६ |
| ओटीटी रिलीज प्लॅटफॉर्म | https://www.netflix.com |
| शूटिंग लोकेशन | सोल (दक्षिण कोरिया) आणि चेन्नई |
| तिकीट बुकिंग | गरज नाही (नेटफ्लिक्सवर उपलब्ध) |
Made In Korea Tamil Movie Review In Marathi 2026 : ट्रेलर (Trailer)
Made In Korea Tamil Movie Review In Marathi 2026 : कलाकार आणि पात्र
| कलाकार आणि पात्रांची नावे | |
|---|---|
| कलाकाराचे नाव | सिनेमातील पात्राचे नाव |
| प्रियांका अरुल मोहन | शेंबा (Shenba) |
| पार्क हाय-जिन (Park Hye-jin) | कोरियन मित्र / मार्गदर्शक |
| ऋषिकांत (Rishikanth) | शेंबाचा बॉयफ्रेंड |
| नो हो-जिन (No Ho-jin) | सह-कलाकार |
Made In Korea Tamil Movie Review In Marathi 2026 : कथा (Story)
मेड इन कोरिया या चित्रपटातील मुलगी शेनाबा ही मुलगी तमिळनाडू मधील एक डोंगराळ भागात राहत असते. लहानपणापासूनच तिचं आयुष्य अगदी सामान्य आणि साध सरळ असतं. एकदा शाळेत वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा होते आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने तिला दक्षिण कोरियाच्या इतिहासाबद्दल थोडी माहिती मिळते. आणि इथूनच शेनबाला दक्षिण कोरियाच्या संस्कृती विषयी आकर्षण निर्माण होतं.
अधिक माहिती साठी ती कोरियन भाषा शिकण्याचा प्रयत्न करू लागते. तिथल्या लोकांचे पारंपरिक सण, उत्सव चालीरीती अशा अनेक गोष्टींकडे ती लक्ष देण्यास सुरुवात करते.
पुढे कथा अशा वळणावर येते की कालांतराने ती दक्षिण कोरिया मधील सियोल या शहरात येते. तिथे तिला अनेक अडथळे येतात. छोट्या छोट्या गोष्टी शिकणं तिला गरजेच वाटू लागते. उदाहरणार्थ बस च्या रांगेत उभे राहणे, स्थानिक भाषेमधील व्यवहारिक शब्द शिकणे आणि अजून बऱ्याच गोष्टी. नंतर तिची भेट एका कोरियन मुलाशी होते. तो तिचा चांगला मित्र बनतो. पुढे जेव्हा तिला earning साठी कामाची गरज असते. तेव्हा एका आजारी वयस्कर आजी ची काळजी घेण्याचे (care taker) चे काम मिळते. आणि तिच्या स्ट्रगल मध्ये एक पाऊल ती पुढे टाकते. बाकी अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे ती अनोळख्या देशात करण्याचे धाडस करते ते आपल्याला हा सिनेमा पाहूनच समजेल.
Made In Korea Tamil Movie Review In Marathi 2026 : स्टार परफॉर्मन्स (Star performance)
या चित्रपटात Priyanka Mohan हिने साकारलेली शेनबा ही व्यक्तिरेखा खूप प्रामाणिक आणि मनापासून सादर केली आहे. तिचा अभिनय पाहून असे समजून येते की प्रियांका ने या पात्रासाठी अगदी जीव तोडून मेहनत घेतली आहे. तिच्या अभिनयामुळे संपूर्ण कथेला एक वेगळीच चकाकी मिळते. शेनबा ही साधी, निरागस आणि स्वप्नाळू मुलगी आहे, आणि प्रियंका मोहनने तिच्या चेहऱ्यावरील भाव, संवाद आणि छोट्या-छोट्या हावभावांमधून हे व्यक्तिमत्त्व खूप नैसर्गिकपणे दाखवले आहे. जे तिच्या कलेची प्रतिभा झळकवत. त्यामुळे प्रेक्षकांना सिनेमामधला शेनबा चा प्रवास हा आपला प्रवास वाटतो.
Made In Korea Tamil Movie Review In Marathi 2026 : गुड ऑर बॅड (Good Or Bad)
Good –
सिनेमा चा चांगला भाग म्हणजे सिनेमामध्ये कुठचाही अश्लील रोमान्स सीन दाखवला नाही आहे. उलट शेनबा चा त्या वृद्ध महिले प्रती असलेली प्रेमाची भावना तसेच आपुलकीने घेतलेली तिची काळजी या सर्व गोष्टी सिनेमाची शोभा वाढवताना दिसतात.
Bad –
काही ठिकाणी सिनेमा मध्ये काही गोष्टींचा एकमेकांशी ताळमेळ बसताना दिसत नाही. शेनबा च्या संदर्भात अचानक काही कथा सुरू होताना दिसून येतात त्यामुळे थोड गोंधळल्या सारखं वाटत.
Made In Korea Tamil Movie Review In Marathi 2026 : चित्रपट पहावा की नाही? (Watch OR Not)
नक्कीच हा चित्रपट एका अशा मुली बद्दल आहे जी आपल्या आवडत्या पण अनोळखी संस्कृती ला जाणून घेण्यासाठी दूरदेशी जाते. आणि तिला तिथे जाऊन जीवन जगण्यासाठी ज्या कठिणाई चा सामना करावा लागतो ते सर्व सिनेमामध्ये दाखवलं गेल आहे.
FAQ–
1)Made In Korea चित्रपटाची कथा कशाबद्दल आहे?
उत्तर – हा चित्रपट शेनबा नावाच्या तामिळनाडूतील मुलीची कथा सांगतो, जी K-Culture बद्दलच्या आकर्षणामुळे Seoul येथे येते आणि तिथे स्वतःचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करते.
2) Made In Korea मध्ये मुख्य भूमिका कोणी केली आहे?
उत्तर – या चित्रपटात मुख्य भूमिका अभिनेत्री Priyanka Mohan हिने साकारली आहे.
3) Made In Korea चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले आहे?
उत्तर – या चित्रपटाचे दिग्दर्शन Ra Karthik यांनी केले आहे.
4)Made In Korea चित्रपट कुठे पाहता येईल?
उत्तर – हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पाहता येतो.
5) Made In Korea चित्रपटात विशेष काय आहे?
उत्तर – या चित्रपटात भारतीय आणि कोरियन संस्कृतीचा संगम दाखवण्यात आला आहे आणि स्वतःची ओळख शोधण्याचा भावनिक प्रवास दाखवला आहे.