दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि अभिनेता शाहिद कपूर यांचा O’ Romeo हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण भारतामध्ये प्रदर्शित झाला. O Romeo हा चित्रपट साधारणता ऍक्शन थ्रिलर आणि रोमांटिक ड्रामा असा चित्रपट आहे.
तसेच चित्रपटांमध्ये ८० ते ९० च्या दशकातील मुंबई अंडरवर्ल्ड चे वातावरण साधारणतः पाहायला मिळते. चित्रपटांमध्ये शाहिद कपूर ने हुसेन उस्तारा या अंडरवर्ल्डच्या गँगस्टर ची भूमिका निभावली आहे तर तृप्ती डिमरी हिने अंडरवर्ल्ड लेडी गॅंगस्टर सपना दीदी हिची भूमिका पार पाडली आहे.

O Romeo Movie In Marathi 2026 : रिव्ह्यू आणि संपूर्ण माहिती
| चित्रपटाचे नाव | ओ रोमिओ २०२६ |
| दिग्दर्शक | विशाल भारद्वाज |
| रिलीज डेट | १३ फेब्रुवारी २०२६ |
| ट्रेलर रिलीज दिनांक | २१ जानेवारी २०२६ |
| निर्माता | साजिद नाडियावाला |
| कथा | हुसेन जाईदी |
| डायलॉग राइटिंग | विशाल भाप्लेज |
| स्क्रीन प्ले | रोहन नारुळे, विशाल भारद्वाज |
| गीतकार | गुलजार |
| गायक | रफ्तार, बादशाह, हनी सिंग, श्रेया घोषाल, अभिजीत सिंग, जुबिन नौटियाल, नीरज श्रीधर |
| म्युझिक प्रोड्युसर | केतन सोड |
| चित्रपटाचा बजेट | अंदाजे १२५ कोटी ते १५० कोटी |
| भाषा | हिंदी |
| तिकीट बुकिंग | Book My Show https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https://www.bookmyshow.com/&ved=2ahUKEwjk367Kq-iSAxVaRmwGHasEApAQFnoECCYQAQ&usg=AOvVaw3ShL627DCUmtBDQuRpzoG8 |
| OTT रिलीज प्लॅटफॉर्म | ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ |
O’ Romeo Movie In Marathi 2026 : मुख्य कलाकार आणि त्यांचे मानधन
O’ Romeo हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून मुंबई अंडरवर्ल्ड संबंधित घटनांशी निगडित आहे. तसेच दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी ही बाब लक्षात घेऊन कलाकारांचे देखील त्याचप्रमाणे चयन केले आहे तर या चित्रपटामध्ये मुख्य कलाकार कोण आहेत ? आणि त्यांचे मानधन किती ? ते आपण पाहूया.
| शाहिद कपूर | ४५ कोटी |
| तृप्ती डीमरी | ६ कोटी |
| दिशा पटानी | २ कोटी |
| नाना पाटेकर | ४ कोटी |
| विक्रांत मॅसे | १.५ कोटी |
| तमन्ना भाटिया | ७ कोटी |
| अविनाश तिवारी | ७ कोटी |
| फरीदा जलाल | अधिकृत माहिती नाही |
| राहुल देशपांडे | अधिकृत माहिती नाही |
O’ Romeo Movie In Marathi 2026 : कथा
शाहिद कपूर याचा O’Romeo हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून यामध्ये मुंबई अंडरवर्ल्ड मधील काही सत्य घटना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
शाहिद कपूरच कॅरेक्टर हे हुसेन उस्तरा या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत आहे. जो ८०-९० च्या दशकात मुंबई अंडरवर्ल्ड मधील कुख्यात गँगस्टर होता. आणि मुंबईचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा कट्टर वैरी होता. ज्याने अनेक वेळा दाऊदच्या कामांमध्ये अडथळा आणला होता. इतकेच नव्हे तर हुसेन उस्तरा याने दाऊदला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला होता.
सिनेमामध्ये अभिनेत्री तृप्ती डिमरी ही देखील आपल्याला दिसणार आहे. तृप्ती चे नाव अश्फा कुरेशी असे दाखवले गेले आहे. तसेच तृप्ती च कॅरेक्टर देखील अंडरवर्ल्ड मधल्या अश्रफ खान म्हणजेच सपना दीदी शी निगडित आहे. अश्रफ म्हणजेच सपनाचा पती मेहमूद कालिया हा दाऊद इब्राहिम साठी काम करत असे. परंतु काही कारणास्तव दाऊद आणि त्याच्यामध्ये भांडण होतात तसेच businesses च्या संदर्भात देखील दोघांमध्ये तणाव वाढतो. त्यामुळे दाऊद त्याची हत्या घडवून आणतो. व आपल्या पतीचा खुनी हा दुसरा तिसरा कोणी नसून दाऊद इब्राहिमच आहे. हे जेव्हा अश्रफ म्हणजेच सपना दीदी हिला कळत तेव्हा ती आपल्या पतीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आणि दाऊद ला संपवण्यासाठी दाऊद चा त्या वेळेचा सर्वात मोठा दुश्मन हुसेन उस्त्रा याची भेट घेते व हत्यार कसे चालवायची याची Training घेते. आणि आपला पुढचा प्रवास निश्चित करते. अजूनही बऱ्याच गोष्टी आणि पैलू आहेत जे आपल्याला O’Romeo हा चित्रपट बघूनच समजतात.
O’ Romeo Movie In Marathi 2026 : ट्रेलर रिलीज डेट आणि विश्लेषण
O’ Romeo या चित्रपटाचा ट्रेलर २१ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित केला गेला. ट्रेलर मध्ये शाहिद कपूरचा लुक हा एकदम डॅशिंग अंगावर टॅटू, जखमेचे निशाण वैगरे म्हणजे एखाद्या गँगस्टर सारखा दिसून येतो. तसेच ” उस्तरा से पंगा नही लेते ” असा शाहिद चा डायलॉग आहे ज्यामध्ये असे समजते की मुंबई अंडरवर्ल्ड चा कुख्यात गँगस्टर हुसेन उस्तरा याचं कॅरेक्टर शाहिद ने निभवल आहे.
शिवाय ट्रेलर मध्ये अनेक मारामारी, खून आणि काही १८+ डायलॉग आणि सीन्स आहेत. जे अगदी गुन्हेगारी जगताशी match होतात. काही ठिकाणी असेही दिसून येते की शाहिद आणि तृप्ती डिमरी मध्ये प्रेम होते परंतु काही कारणामुळे त्या प्रेमाचा भंग होतो आणि शेवटी त्याचे रूपांतर बदलेच्या भावने मध्ये होते. कारण ” मैं तुम्हें अपनी हर सांस सांस से नोच के निकालूंगा ताकी मेरे अंदर तुम्हारे लिए सिर्फ नफरत रह जाए “असा ही डायलॉग ट्रेलर च्या शेवटी शाहिद चा दिसून येतो.
O’ Romeo Movie In Marathi 2026 : बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ९ वा
| दिवस | कलेक्शन |
| १ ला दिवस | ८.५ कोटी |
| २ रा दिवस | १२.६५ कोटी ते १४.५० कोटी |
| ३ रा दिवस | ९ कोटी ते ११ कोटी |
| ४ था दिवस | ४.७५ कोटी ५.१० कोटी |
| ५ वा दिवस | ५.१ कोटी |
| ६ वा दिवस | ३.५ कोटी |
| ७ वा दिवस | ०.९५ ते १.१४ कोटी |
| ८ वा दिवस | २.१५ कोटी ते ३.२५ कोटी |
| ९ वा दिवस | ३.३५ कोटी ते ४.५ कोटी |
| एकूण रक्कम | ५२.६० कोटी ते ६०.२६ कोटी |
O’ Romeo Movie In Marathi 2026 : मराठमोळा गायक राहुल देशपांडे ही चित्रपटांमध्ये साकारणार भूमिका
मित्रांनो विशाल भारद्वाज यांच्या O’ Romeo या चित्रपटामध्ये आता मराठमोळा गायक राहुल देशपांडे ही भूमिका साकारणार आहे. मुलाखतीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार राहुल देशपांडे हा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावणार आहे. या पोलीस अधिकाऱ्याने अश्रफ खान म्हणजेच सपना दीदी हिच्या पतीचा बनावट एन्काऊंटर दाऊदच्या सांगण्यावरून केलेला असतो. त्यामुळे जेव्हा ही बातमी सपनाला समजते. तेव्हा अश्रफ खान म्हणजेच सपना दिली ही राहुलचा बदला घेण्यासाठी सतत संधी शोधत असत. त्यामुळे राहुल देशपांडे ची ही भूमिका पाहण योग्य ठरणार आहे.
O’ Romeo Movie In Marathi 2026 : नाना पाटेकर ट्रेलर रिलीज च्या वेळी का निघून गेले ? आणि त्यावर दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांची काय प्रतिक्रिया होती?
O’ Romeo चित्रपटाचा ट्रेलर रिलीज च्या दिवशी नाना पाटेकर हे अगदी वेळेवर पोहचले होते. परंतु काही कारणामुळे बाकीच्या सहकाऱ्यांना यायला उशीर झाला आणि तब्बल १ तास नाना पाटेकरांना वाट बघावी लागली आणि १ तास उलटून गेला तरी कार्यक्रम सुरू झाला नव्हता म्हणून नाना पाटेकर ट्रेलर रिलीज च्या वेळी तिथून निघून गेले.
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांना नानांबद्दल या संदर्भात प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणाले शाळेमध्ये जसा लहान मुलगा असतो ना खोडकर आणि मस्ती करणारा तसा काहीसा नानांचा स्वभाव आहे. सर्वांचे मनोरंजन ( entertainment ) करणारा. आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा की ज्याच्या सोबत सगळ्यांना रहावस वाटतं तसेच, प्रतिक्रिया देताना पुढे ते म्हणाले की नाना आणि माझी २७ वर्षां पासून ची मैत्री आहे आणि पहिल्यांदा आम्ही एकत्र काम केलय. ते जर असते तर आम्हाला पण खरच आनंद झाला असता. पण ते आता नाही आहेत ते आपल्या signature स्टाईलमध्ये की “बाबा मला 1 तास वाट बघायला लावली आता मी निघून जातो ” असे म्हणत निघून गेले. आणि आम्हाला त्याच जरा पण वाईट वाटलं नाही. कारण याच गोष्टी नाना पाटेकरांना नाना पाटेकर बनवतात असे ही ते म्हणाले.
O’ Romeo Movie In Marathi 2026 : हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे का ?
O’Romeo हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे.या चित्रपटा मध्ये ८०-९० च्या दशकातील मुंबई अंडरवर्ल्ड चे जग आणि त्यावेळीचा कुख्यात गँगस्टर हुसेन उस्तरा आणि अश्रफ खान म्हणजेच सपना दीदी यांविषयी दाखवले गेले आहे.
O’ Romeo Movie In Marathi 2026 : हुसेन उस्तारा आणि अश्रफ खान म्हणजेच सपना दीदी कोण होती?
हुसेन उस्तरा आणि सपना दीदी यांचा संबंध मुंबई अंडरवर्ल्ड जगताशी होता. ८० – ९० च्या दशकात मुंबई मध्ये माफियाराज होते. भर दिवसा खून होणे, मारामाऱ्या होणे, चाकू-सुरे आणि अजून काही धार धार शस्त्र बाळगणे या normal गोष्टी होत्या. तसेच बेकायदेशीर धंदा करणे, तस्करी करणे, शिवाय जन सामन्यांमध्ये दहशद पसरवणे हे सर्व प्रकार सर्हास होत असत.
असाच एक मुंबई च्या पायधुनी एरिया मध्ये हुसेन शेख नावाचा व्यक्ती राहत असे. एक दिवस हुसेन आणि एका अज्ञात व्यक्तीची काही कारणांमुळे बाचाबाची होते आणि हा वाद इतका शिगेला पोहोचतो की हुसेन समोरच्या माणसावर वस्तऱ्याने हल्ला करून वार करतो.आणि त्या पिडित व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये नेण्यात येते. हुसेन ने केलेले ते वार इतके sharp असतात की डॉक्टर देखील अचंबित होऊन म्हणतात की एखाद्या प्रोफेशनल डॉक्टर ने ऑपरेशन साठी केलेले कट्स आहेत. आणि तिथूनच हुसेन शेख याला हुसेन वस्तारा असे नाव पडते. कालांतराने हुसेन गुन्हेगारी क्षेत्रात एवढा पुढे जातो की कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा तो कट्टर दुश्मन बनतो. दाऊद चे अनेक बेकायदेशीर तस्कऱ्या , काळे धंदे आणि इतर बेकायदेशीर व्यवसाय यांबद्दल पोलिसांना माहिती देऊन. दाऊद च्या प्रत्येक कामात डोईजड होत असतो. दाऊद ला देखील तो एखाद्या काट्या प्रमाणे खुपत असतो. अनेकदा दाऊद वर प्राण घातक हल्ला देखील त्याने केलेला असतो.
तर सपना दीदी म्हणजे अश्रफ खान.अश्रफ चा पती मेहमूद खान कालिया हा दाऊद चा च हस्तक असतो. आणि दाऊद इब्राहिम गँग साठी दुबई ला काम करत असतो. शिवाय अश्रफ ला देखील तो घर चालवायला दुबई मधून पैसे पाठवत असतो. आणि एकदिवस अचानक मेहमूद च्या मरण्याची खबर अश्रफ ला समजते आणि अश्रफ पूर्ण पणे तुटून जाते. सखोल चौकशी केल्यानंतर तिला समजते की दाऊद ने च आपल्या पतीची हत्या घडवून आणली आहे.आणि आपल्या पतीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अश्रफ ही हुसेन उस्तारा याची मदत घेते जो त्यावेळीचा दाऊद चा सगळ्यात मोठा दुश्मन असतो. तसेच अश्रफ ही हुसैन कडून बंदूक चालवणे, हत्यार चालवणे अशा अनेक गोष्टींचे ज्ञान मिळवते. दाऊद ला आपली खबर लागू नये म्हणून ती अश्रफ वरून स्वतःच नाव सपना ठेवते आणि पुढे मुंबई अंडरवर्ल्ड जगतात सपना दीदी म्हणून प्रसिद्ध होते.
O’Romeo Movie In Marathi 2026 : हुसैन उस्तरा ची मुलगी सनोबर शेख हिने दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांना का पाठवली 2 कोटींची नोटीस ?
हुसेन उस्तरा ची मुलगी सनोबर शेख ने दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांना 2 कोटींची अब्रुनुकसानी ची नोटीस पाठवली आहे. त्यांच्या कथना नुसार
१) O’Romeo हा चित्रपट बनवताना दिग्दर्शकाने शेख परिवाराची permission घेतली नव्हती.
२) तसेच तिचे वडील म्हणजेच हुसेन उस्तरा हे सपना दीदी ला बहिणी सारखे मानत असत आणि असे असताना देखील चित्रपटा मध्ये वडिलांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
O’Romeo Movie In Marathi 2026 : दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी सनोबर शेख हिला काय उत्तर दिले ?
दिग्दर्शक विशाल भारद्वाज म्हणाले की O’Romeo हा चित्रपट Mafia Queens Of Mumbai या पुस्तकातील माहिती च्या आधारावर बनवला गेला आहे. तसेच चित्रपटातील सर्व कॅरेक्टरांचे Copy Rights हे विकत घेतले गेले आहे. त्यामुळे कोणाच्याही अब्रु नुकसानीचा प्रश्नच उपस्थित होत नाही.
FAQ ( Frequently Ask Question)
1) O’ Romeo चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे का?
उत्तर– हो, हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.
2) O’ Romeo या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?
उत्तर– विशाल भारद्वाज हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
3) चित्रपट कोणत्या पुस्तकावर आधारित आहे?
उत्तर– हा चित्रपट Mafia Queens Of Mumbai या पुस्तकावर आधारित आहे.
4) चित्रपटांमध्ये मुख्य कलाकार कोण आहेत?
उत्तर – शाहिद कपूर, तृप्ती डिंगरी, नाना पाटेकर, अविनाश तिवारी इत्यादी मुख्य कलाकार आहेत.