Top 5 Upcoming Marathi Movies 2026: जाणून घ्या या वर्षी मराठी सिनेमांमध्ये काय खास आहे?

मित्रांनो आपल्याला माहितीच आहे. की हल्लीच्या काळात भारतीय फिल्म इंडस्ट्री खूप उत्तम प्रकारे प्रगती करत आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपली मराठी सिनेसृष्टी पण काय मागे नाही आहे. उत्तम कथा, दिग्दर्शक, अभिनय तसेच नवीन टेक्नॉलॉजी चा वापर याच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टी देखील संपूर्ण जगात धुमाकूळ घालतेय.आणि त्यामुळेच मराठी फिल्म इंडस्ट्री ची लोकप्रियता देखील वाढत आहे.

व म्हणून २०२६ हे वर्ष देखील रसिक प्रेक्षकांसाठी खूप खास असणार आहे. कारण या वर्षी देखील अनेक विषयांवर आधारित मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहेत.जे समाजापुढे नक्कीच चांगल्या गोष्टी ठेवतील आणि प्रबोधनाचं कार्य करतील.

तर, या पोस्ट मध्ये आपण Top 5 Upcoming Marathi Movies 2026 यांचा आढावा घेणार आहोत. जे नक्कीच बॉक्स ऑफिसवर आपला जलवा दाखवतील.

Top 5 Upcoming Marathi Movies 2026 : सिनेमांची यादी

१) राजा शिवाजी

२) तिघी

३) सालबर्डी

४) कलावती

५) सुपर–डूपर

Top 5 Upcoming Marathi movie 2026: राजा शिवाजी

Top 5 Upcoming Marathi Movies 2026

मित्रांनो राजा शिवाजी हा चित्रपट आपल्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट १ मे २०२६ रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे आणि त्याचे दिग्दर्शन हे रितेश देशमुख यांनी केले आहे. तसेच रितेश हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत देखील दिसणार आहे. महाराजांची भूमिका साकारायची म्हणजे खूप मोठं पवित्र कार्य आहे. तर रितेश ही जबाबदारी कशी निभावणार ? याकडे देखील प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

राजा शिवाजीi या चित्रपटामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन प्रवास पहायला मिळणार आहे. सगळीकडे अन्याय अत्याचार होत असताना महाराज कसे हिंदवी स्वराज्य उभारतात ? आणि स्वराज्याला सुराज्य कडे कसे नेतात ? ही शिकवण पण आपल्याला सिनेमाच्या माध्यमातून नक्कीच भेटेल यात काही शंका नाही.

मित्रांनो रितेशने या आधी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहे. परंतु राजा शिवाजी हा रितेशच्या दिग्दर्शनाच्या करिअर मधला पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे. सिनेमा मध्ये अनेक दिग्गज कलाकार आपल्याला पहायला मिळणार आहे.

तर चित्रपटाबद्दल आणखीन जाणून घेऊया chart च्या माध्यमातून–

चित्रपटाचे नाव राजा शिवाजी
दिग्दर्शक रितेश देशमुख
निर्मितीजिओ स्टुडिओ आणि मुंबई फिल्म कंपनी
चित्रपट रिलीज डेट १ मे २०२६
चित्रपटाचे स्वरूपऐतिहासिक
मुख्य कलाकार रितेश देशमुख,जेनेलिया देशमुख, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, संजय दत्त, सलमान खान, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, मयुर मोरे, फरदीन खान, विद्या बालन, अमोल गुप्ते, जितेंद्र जोशी, लविश चौहान, सनी घनसानी, अथर्व पांडे, अमृत शर्मा, बिलाल हुसैन
भाषामराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम
संगीतअजय – अतुल
बजेट अंदाजे १५० ते २५० कोटी
शुटिंग लोकेशन सातारा – वाई, गोरेगाव फिल्म इंडस्ट्री(मुंबई), सह्याद्री पर्वत रंगांमधील काही परिसर

Top 5 Upcoming Marathi movie 2026: तिघी

Top 5 Upcoming Marathi Movies 2026

तिघी हा कौटुंबिक चित्रपट आहे. जो ६ मार्च २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आई आणि तिच्या दोन मुली याबाबत दाखवलं गेल आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन हे जिजीविषा काळे यांनी केले असून पटकथा लेखन हे प्राजक्त देशमुख आणि निखिल महाजन यांनी केले आहे.

तिघी ही दोन बहिणींची आणि त्यांच्या आईची काळजाला भिडणारी इमोशनल कथा आहे. ज्यामध्ये दोन बहिणी आईची तब्येत बिघडल्या मुळे अनेक वर्षानंतर एकत्र येतात. आणि आईची सेवा करण्यासाठी एका घरात एका छताखाली राहू लागतात. खूप वर्षानंतर एकत्र आल्यामुळे परत एकदा त्यांना आपल्या सर्व जुन्या आठवणींची उजळणी होते. आणि काही कारणांमुळे दोघींमध्ये असलेला दुरावा हळू हळू संपत येतो. तसेच आई देखील दशकांपासून दडवून ठेवलेलं गुपित समोर आणते आणि इथे कथेला वेगळं रूप मिळत. तर ते गुपित नक्की काय असतं ? आणि कोणत्या कारणांमुळे दोन्ही बहिणी वेगळ्या राहत असतात ? ते आपल्याला सिनेमा पाहिल्यावरच लक्षात येईल.

तसेच सिनेमाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, ”आई आणि मुलीचं नातं हे अनेकदा शब्दा पलीकडचं असतं. तसेच या नात्यामध्ये प्रेम हे व्यक्त होत नसत, तर ते फक्त जाणवतं असत. ‘बऱ्याचदा कुटुंबातील सदस्यांच्या वेदना न बोलताच समजल्या जातात”आणि म्हणून आम्ही अशाच न बोललेल्या संवादांचा वेदनांचा आणि न दिसणाऱ्या भावनांचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न तिघी या चित्रपटाच्या माध्यमातून करत आहोत.

तर या सिनेमातील काही गोष्टींचा तपशील आपण पाहूया –

चित्रपटाचे नाव तिघी
चित्रपटाचे स्वरूपकौटुंबिक
दिग्दर्शिका जिजीविषा काळे
निर्मातेनिखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे, आणि नेहा पेंडसे
रिलीज डेट ६ मार्च २०२६
लेखकप्राजक्त देशमुख, निखिल महाजन
कलाकारभारती आचरेकर, पुष्कराज चिरपुटकर, सोनाली कुलकर्णी, नेहा पेंडसे, जैमिनी पाठक, निपुण धर्माधिकारी
भाषा मराठी
संगीत दिग्दर्शक अद्वैत नेमळेकर, निलेश मोहरीर
गीतकारजितेंद्र जोशी
बजेट अंदाजे ३ ते ५ कोटी
शूटिंग लोकेशन कोकण ( महाराष्ट्र )

Top 5 Upcoming Marathi movie 2026: सालबर्डी

Top 5 Upcoming Marathi Movies 2026

मित्रांनो ३ एप्रिल २०२६ रोजी सालबर्डी हा चित्रपट आपल्या भेटीला येत आहे. हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे.याचे दिग्दर्शन हे रमेश साहेबराव चौधरी यांनी केले असून. पटकथा ही रोहित शुक्रे यांनी लिहिली आहे.

मित्रानो गोष्टीची सुरुवात होते सालबर्डी नावाच्या गावा पासून तर ,सालबर्डी नावाचे एक गाव असते. गावामध्ये अनेक रहस्यमयी घटना घडत असतात. जसे की अपघात होते. रहस्यमयी पद्धतीने मृत्यू होणे.आणि या सगळ्या गोष्टींचा छडा लावण्यासाठी पोलिस अधिकारी तपास सुरू करतात. तसेच त्यांच्यावर अनेक राजकीय दबाव असतात. आणि अशा परिस्थितीत मुळे गावात देखील खूप गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण असते. तर नक्की या घटनांमागे काय वास्तव दडदलय ? आणि पोलिस अधिकारी कशा या रहस्यमयी घटनांचा पाठ पुरावा करून सत्य बाहेर आणतात अन आणि गाववल्यांना दिलासा देतात ? ते आपल्याला चित्रपट बघूनच समजेल.

चला तर चित्रपटाचा तपशील पाहूया chart च्या माध्यमातून –

चित्रपटाचे नाव सालबर्डी
दिग्दर्शकरमेश साहेबराव चौधरी
पटकथा रोहित शुक्रे
रिलीज डेट ३ एप्रिल २०२६
चित्रपटाचा प्रकार सस्पेन्स–थ्रिलर
कलाकार पूजा सावंत, गश्मीर महाजनी, सोनाली कुलकर्णी, ओंकार भोजने, शशांक शेंडे, भारत गणेशपुरे.
गायक अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी, आनंद जोशी
पार्श्वसंगीतअमर मोहिते
भाषामराठी
बजेटअंदाजे ५ ते १० कोटी
ड्युरेशन  २ तास ते २ तास २० मिनिटे
शूटिंग लोकेशनसालबर्डी गाव ( अमरावती जिल्हा आणि मध्यप्रदेश सीमा)

Top 5 Upcoming Marathi movie 2026: कलावती

Top 5 Upcoming Marathi Movies 2026

मित्रांनो संजय जाधव दिग्दर्शित कलावती हा सिनेमा देखील आपल्या भेटीला येत आहे. अद्याप त्याची ऑफिशियल रिलीज डेट याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती कलावती या फिल्मच्या मॅनेजमेंटने दिलेली नाही.

कलावती हा चित्रपट हॉरर आणि कॉमेडी यांचा फ्युजन आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अमृता खानविलकर म्हणजेच कलावती आपल्याला दिसणार आहे. तसेच अनेक रहस्यमयी घटना दाखवल्या गेल्या आहेत. घटना जरी रहस्यमय असल्या किंवा भीतीदायक असल्या तरी प्रेक्षकांना मात्र पोट भरून हसवणाऱ्या नक्कीच आहे त्यामुळे हा चित्रपट पाहताना प्रेक्षक म्हणजे मनोरंजन होणार याबाबत अजिबात शंका नाही.

चला तर पाहूया चित्रपटाचा थोडक्यात तपशील –

चित्रपटाचे नावकलावती
चित्रपटाचे स्वरूपहॉरर – कॉमेडी
दिग्दर्शकसंजय जाधव
निर्मिती MergeXR Studio, AVK Entertainment आणि Fifth Horizon
कलाकारअमृता खानविलकर, संजय नार्वेकर,ओंकार भोजने, तेजस्विनी लोणारी, हरीश दुधाडे, अभिजित चव्हाण, नील सालेकर
रिलीज डेटअधिकृत माहिती नाही
कथानिशांत ए.भुसे, अनुजा कर्णिक, मॅथ्यू फ्रेस
तिकीट बुकिंगhttps://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https://www.bookmyshow.com/&ved=2ahUKEwjk367Kq-iSAxVaRmwGHasEApAQFnoECCYQAQ&usg=AOvVaw3ShL627DCUmtBDQuRpzoG8
ड्युरेशन अंदाजे २ तास २० मिनिटे
शूटिंग लोकेशन लंडन, मुंबई फिल्म सिटी
बजेटअंदाजे ५ ते ८ कोटी

Top 5 Upcoming Marathi movie 2026: सुपर डुपर

Top 5 Upcoming Marathi Movies 2026

मित्रांनो समीर आशा पाटील दिग्दर्शित सुपर डुपर हा चित्रपट देखील ३ एप्रिल २०२६ रोजी आपल्या भेटी साठी येतोय. चित्रपट हा कौटुंबिक पद्धतीचा आहे. प्रत्येक कुटुंबा मध्ये अनेक चढ उतार जडणघडण, सुख:द प्रसंग दुःखद प्रसंग येत असतात. आणि एकमेकांना सांभाळून सावरून आपण त्या कौटुंबिक क्षणाचा सोहळा कसा करायचा ? ते ह्या चित्रपटाच्या माध्यमातून समजते

चित्रपटाचा तपशील थोडक्यात जाणून घेऊया –

चित्रपटाचे नावसुपर डुपर
चित्रपटाचे स्वरूपकौटुंबिक
दिग्दर्शकसमीर आशा पाटील
निर्मितीzee studio
रिलीज डेट३ एप्रिल २०२६
कलाकारललित प्रभाकर, विदुला चौगुले, निर्मिती सावंत, कुशाल बद्रिके, नम्रता संभेराव, हृषिकेश जोशी, शशांक शेंडे.
लेखकसमीर आशा पाटील
बजेटसरासरी बजेट ५ ते ८ कोटी
भाषामराठी
शूटिंग लोकेशनमुंबई
तिकीट बुकिंगhttps://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https://www.bookmyshow.com/&ved=2ahUKEwjk367Kq-iSAxVaRmwGHasEApAQFnoECCYQAQ&usg=AOvVaw3ShL627DCUmtBDQuRpzoG8

Leave a Comment