Ustad Bhagat Singh Movie Review In Marathi 2026 : पवन कल्याण परत एकदा आपल्याच रुबाबात !!

Ustad Bhagat Singh Movie Review In Marathi 2026 :(कथा ,कलाकार, दिग्दर्शक, ट्रेलर रिलीज डेट, चित्रपट रिलीज डेट, निर्माते, स्टार परफॉर्मन्स, गुड ऑर बॅड,हिट की फ्लॉप,फॅन्स रिऍक्शनस, भाषा, शूटिंग लोकेशन, तिकीट बुकिंग)

दिग्दर्शक हरीश शंकर यांचा उस्ताद भगत सिंग हा तेलुगू भाषिक चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. ऍक्शन, ड्रामा, कॉमेडी ने भरपूर असलेला हा चित्रपट रसिक प्रेक्षकां चे लगेच लक्ष वेधून घेतो. त्यात पवन सरांनी केलेला अभिनय हा अजून त्या चित्रपटाला चार चांद लावतो.

Ustad Bhagat Singh Movie Review In Marathi 2026

१९ मार्च २०२६ रोजी उगादी या सणाच्या मुहूर्तावर रिलीज झालेला हा चित्रपट डॅशिंग, रुबाबदार आणि धडाकेबाज पोलिस अधिकाऱ्याची कथा सांगतो. या चित्रपटामध्ये आपल्याला पवन सरांच्या अभिनयाचे परत एकदा भाररगच्च दर्शन होते. हेवी डायलॉग, वॉकिंग स्टाईल, नजरेतील तो करारीपणा या सगळ्या गोष्टींमुळे पवन सर या चित्रपटाच्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेला योग्य तो न्याय देतात.

Ustad Bhagat Singh Movie Review In Marathi 2026 : संपूर्ण रिव्ह्यू आणि माहिती

बाबी (Details) माहिती (Information)
चित्रपटाचे नाव उस्ताद भगत सिंह (Ustaad Bhagat Singh)
दिग्दर्शक हरीश शंकर (Harish Shankar)
निर्माते नवीन येर्नेनी आणि वाय. रवी शंकर (मैत्री मूव्ही मेकर्स)
कथालेखक हरीश शंकर
डायलॉग लेखक हरीश शंकर
म्युझिक डायरेक्टर देवी श्री प्रसाद (DSP)
गायक देवी श्री प्रसाद, अनुराग कुलकर्णी आणि इतर
बजेट अंदाजे ₹१५० – २०० कोटी
चित्रपट रिलीज डेट १९ मार्च २०२६ (प्रस्तावित)
ट्रेलर रिलीज डेट १४ मार्च २०२६ (अपेक्षित)
कालावधी (Duration) अंदाजे १६० मिनिटे
शूटिंग लोकेशन हैदराबाद, विशाखापट्टणम
ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix
तिकीट बुकिंग BookMyShow

Ustad Bhagat Singh Movie Review In Marathi 2026 : कलाकारांची नावे आणि पात्र (Cast & Character)

कलाकाराचे नाव (Actor Name) पात्राचे नाव / भूमिका (Character / Role)
छम्मक चंद्रा (Chammak Chandra) सहाय्यक / विनोदी भूमिका
रामकी (Ramki) माहिती उपलब्ध नाही
मीर सरवर (Mir Sarwar) बगदादी (Bhagdadi)
बी.एस. अविनाश (B.S. Avinash) माहिती उपलब्ध नाही
कौशिक महता (Koushik Mahata) माहिती उपलब्ध नाही
नागा महेश (Naga Mahesh) माहिती उपलब्ध नाही
टेम्पर वामसी (Temper Vamsi) माहिती उपलब्ध नाही
किशोर राजू वसिष्ठ (Kishore Raju Vasistha) मंत्री (Minister)
श्री साई दीप चाटला (Sri Sai Deep Chatla) प्रेझेंटर (Presenter)
पंकज केसरी (Pankaj Kesari) माहिती उपलब्ध नाही
नारा श्रीनू (Narra Srinu) माहिती उपलब्ध नाही

Ustad Bhagat Singh Movie Review In Marathi 2026 : ट्रेलर (Trailer)

Ustad Bhagat Singh या चित्रपटाचे Box Office Collection येथे वाचा.

Ustad Bhagat Singh Movie Review In Marathi 2026 : कथा (Story)

हा चित्रपट एका साध्या आदिवासी मुलाची प्रेरणादायी कथा सांगतो. त्याचे बालपण खूप संघर्षात आणि कठीण परिस्थितीत जाते. त्याच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा येतो जेव्हा त्याला एक दयाळू आणि कर्तव्यनिष्ठ शिक्षक भेटतो. तो शिक्षक त्याच्या जीवनाला योग्य दिशा देतो आणि त्याला शिक्षण, शिस्त आणि न्याय यांचे महत्त्व समजावून सांगतो.तो शिक्षक त्या मुलावर खूप विश्वास ठेवतो आणि त्याचे गूण, त्याची निडरता व अन्यायाविरुद्ध उभा राहण्याची त्याची मानसिकता हे सर्व पाहून त्याला ‘भगत सिंह’ असे नाव देतो.

हे नाव देण्यामागे त्याचा उद्देश असा असतो की त्या मुलाने नेहमी अन्यायाविरुद्ध लढावे आणि सत्याच्या बाजूने उभे राहावे. शिक्षक त्याच्या मनात धैर्य, देशभक्ती आणि प्रामाणिकपणाची भावना रुजवतो.हळूहळू तो मुलगा मोठा होतो आणि आपल्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने शिक्षण पूर्ण करतो. पुढे तो एक कडक आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी बनतो.

पोलिस अधिकारी झाल्यानंतर तो समाजातील गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि शक्तिशाली गुन्हेगारांविरुद्ध लढायला सुरुवात करतो.त्याच्या कामात अनेक अडचणी येतात, पण तो कधीही मागे हटत नाही. तो नेहमी न्यायासाठी उभा राहतो आणि गरीब व सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो.

त्याच्या आयुष्यात त्याच्या शिक्षकाने दिलेले संस्कार त्याला सतत योग्य मार्ग दाखवत राहतात.हा चित्रपट आपल्याला शिकवतो की योग्य मार्गदर्शन, शिक्षण आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर कोणतीही व्यक्ती मोठे बदल घडवू शकते आणि समाजासाठी प्रेरणा बनू शकते. अजून बरेचसे पैलू आणि suspense गोष्टी आहेत जे आपल्याला चित्रपट पाहूनच समजते.

Ustad Bhagat Singh Movie Review In Marathi 2026 : स्टार परफॉर्मन्स (Star performance)

चित्रपटात सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे Pawan Kalyan यांची स्क्रीनवरची उपस्थिती आणि त्यांची डायलॉग बोलण्याची स्टाईल.ते जेव्हा स्क्रीनवर येतात, तेव्हा प्रेक्षकांना खूपच “mass” फील येतो. विशेषतः त्यांची पोलीस स्टेशनमधली एन्ट्री आणि action सीन खूपच दमदार दाखवले आहेत. हे सीन पाहताना प्रेक्षकांना खूप ऊर्जा आणि excitement जाणवते.त्यांच्या action मध्ये एक वेगळीच स्टाईल आहे. ते गुन्हेगारांशी जेव्हा सामना करतात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास आणि attitude खूप प्रभावी दिसतो. त्यामुळे त्यांचे सीन खूप लक्षात राहतात.या चित्रपटात त्यांची जुनी “विंटेज” स्टाईलही पुन्हा दिसते. म्हणजे ते जसे पूर्वी कडक आणि रफ अँड टफ भूमिकांमध्ये दिसायचे, तसाच feel इथेही मिळतो.त्यांची डायलॉग डिलिव्हरी खूप सोपी पण प्रभावी आहे. ते साधे संवादही इतक्या ताकदीने बोलतात की सीन अधिक जिवंत वाटतो.

श्रीलीला यांनी देखील या चित्रपटात तिची भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. तिच्या अभिनयासोबतच तिचे डान्स स्टेप्स प्रेक्षकांना खूप आवडतात. विशेषतः ती आणि Pawan Kalyan यांच्यातील स्क्रीनवरील केमिस्ट्री प्रेक्षकांना आकर्षक वाटते.तिचे काही डान्स सीन खूप एनर्जेटिक आणि मनोरंजक आहेत, त्यामुळे ते लक्षात राहतात. ती स्क्रीनवर दिसते तेव्हा एक वेगळीच freshness जाणवते.मात्र काही प्रेक्षकांचे असेही मत आहे की तिची भूमिका कथेमध्ये थोडी मर्यादित आहे, म्हणजे तिला जास्त स्क्रीन टाइम किंवा मोठा सीन मिळाला असता तर अजून चांगलं वाटलं असतं.

या चित्रपटात खलनायकाची भूमिका R. Parthiban यांनी साकारली आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून मिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही लोकांना त्यांचा अभिनय ठीक वाटला, पण काहींना असेही वाटले की नायकाच्या ताकदीसमोर त्यांचे पात्र थोडे कमजोर दिसते.

तर दुसरीकडे Raashii Khanna हिनेही या चित्रपटात भूमिका केली आहे. मात्र तिची भूमिका खूप छोटी आहे. तिला कथेत फारसा स्क्रीन टाइम किंवा अभिनय दाखवण्याची संधी मिळालेली नाही, असे अनेक प्रेक्षकांचे मत आहे.

Ustad Bhagat Singh Movie Review In Marathi 2026 : कॉन्ट्रोवर्सी (controversy)

विषय माहिती
जातीविषयक टिप्पणी चित्रपटातील खलनायक आर. पार्थिबन यांनी हैदराबादमधील एका प्री-रिलीज कार्यक्रमात स्वतःच्या जातीचा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर त्यांनी “जीभ घसरली” असे सांगत जाहीर माफी मागितली.
राजकीय संवाद पवन कल्याण हे उपमुख्यमंत्री असल्यामुळे चित्रपटात राजकीय संवाद असतील अशी चर्चा होती. टीझरमध्ये ‘टी ग्लास’ चिन्ह दिसल्यामुळे वाद निर्माण झाला. मात्र दिग्दर्शकाने स्पष्ट केले की चित्रपटात कोणतेही थेट राजकीय संवाद किंवा टोमणे नाहीत.
सोशल मीडिया वाद चित्रपट रिलीजपूर्वी सोशल मीडियावर नकारात्मक आणि अपमानास्पद पोस्ट्स पसरवल्याचा आरोप निर्मात्यांनी केला. यानंतर न्यायालयाने X, YouTube आणि Google सारख्या प्लॅटफॉर्मवर अशा मजकुरावर बंदी घालण्याचे आदेश दिले.
चाहत्यांसोबत वाद दिग्दर्शक हरीश शंकर यांनी एका ट्वीटला दिलेल्या उत्तरामुळे महेश बाबू यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. नंतर त्यांनी या गैरसमजाबद्दल माफी मागितली.
रिमेकची चर्चा हा चित्रपट विजयच्या ‘तेरी’चा रिमेक आहे का यावर मोठी चर्चा झाली. मात्र दिग्दर्शकाने हा पूर्णपणे नवीन चित्रपट असल्याचे सांगून या वादाला पूर्णविराम दिला.

Ustad Bhagat Singh Movie Review In Marathi 2026 : हिट की फ्लॉप (Hit or Flop)

हा चित्रपट आजच रिलीज झाला आहे. त्यामुळे हिट किंवा फ्लॉप हे स्पष्ट करण थोडं कठीण आहे. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूने विचार केला तर पवन सरांचा fan base पाहता असे वाटते की हा सिनेमा सुपर डुपर हिट होण्याचे खूप chances आहेत.

Ustad Bhagat Singh Movie Review In Marathi 2026 : गुड ऑर बॅड (Good Or Bad)

वैशिष्ट्ये (Features) सकारात्मक बाजू (Good / Pros) नकारात्मक बाजू (Bad / Cons)
कलाकार (Performance) पवन कल्याण यांचा ‘विंटेज’ स्वॅग आणि एनर्जी जबरदस्त आहे. चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे. इतर पात्रांना (विशेषतः अभिनेत्रींना) फारसा वाव दिलेला नाही.
दिग्दर्शन आणि कथा (Direction & Story) हरीश शंकर यांनी मास प्रेक्षकांना आवडतील असे अ‍ॅक्शन आणि डायलॉग्स उत्तम रित्या मांडले आहेत. कथा थोडी जुन्या धाटणीची आणि प्रेडिक्टेबल (अंदाज लावण्यासारखी) वाटते.
संगीत (Music) देवी श्री प्रसाद यांचे संगीत आणि बॅकग्राउंड स्कोअर चित्रपटाचा प्रभाव वाढवतात. काही गाणी कथेच्या ओघात थोडी अडथळा निर्माण केल्यासारखी वाटतात.
मनोरंजन मूल्य (Entertainment Value) हा एक प्रॉपर ‘मसाला’ चित्रपट असून फॅमिली आणि चाहत्यांसाठी पैसा वसूल आहे. काही ठिकाणी पटकथा (Screenplay) संथ वाटते, ज्यामुळे प्रेक्षक थोडे बोर होऊ शकतात.

Ustad Bhagat Singh Movie Review In Marathi 2026 : चित्रपट पहावा की नाही? (Watch OR Not)

नक्कीच हा चित्रपट पाहण्यासारखा आहे, विशेषतः Pawan Kalyan यांच्या mass action आणि डायलॉगसाठी. दमदार एन्ट्री, स्टायलिश सीन आणि मनोरंजन आवडत असेल तर नक्की बघा. कथा साधी असली तरी entertainment value चांगली आहे, एकदा पाहण्यासारखा अनुभव आहे.

Ustad Bhagat Singh Movie Review In Marathi 2026 : फॅन्स रिऍक्शनस (Fan’s Reaction)

i

FAQ –

1) Ustaad Bhagat Singh कोणता चित्रपट आहे?

उत्तर – हा एक Telugu action movie आहे ज्यात एका आदिवासी मुलाची गोष्ट दाखवली आहे, जो पुढे प्रामाणिक पोलीस अधिकारी बनतो.

2) या चित्रपटाचा मुख्य अभिनेता कोण आहे?

उत्तर- या चित्रपटात मुख्य भूमिका Pawan Kalyan यांनी साकारली आहे.

3) हा चित्रपट कशावर आधारित आहे?

उत्तर- हा चित्रपट अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आणि समाजासाठी काम करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या कथेला दाखवतो.

4) या चित्रपटात खलनायक कोण आहे?

उत्तर- या चित्रपटात खलनायकाची भूमिका R. Parthiban यांनी केली आहे.

5) हा चित्रपट पाहण्यासारखा आहे का?

उत्तर- हो, जर तुम्हाला mass action, डायलॉग आणि Pawan Kalyan यांचा अभिनय आवडत असेल तर हा चित्रपट एकदा नक्की पाहण्यासारखा आहे

Leave a Comment