Vijay-Rashmika Wedding Confirm 2026 : अखेर रश्मिकाचा विजय झाला

Vijay-Rashmika Wedding Confirm 2026

Vijay-Rashmika Wedding Confirm 2026 :(विवाह तारीख, विवाह स्थळ, विवाह नाव, लव्ह स्टोरी, पाहुणे मंडळी, लग्नातील फंक्शन्स, लग्नातील जेवण, रिसेप्शन सोहळा)

मित्रांनो, साऊथचा सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा आणि National Crush Of India अशी ओळख असलेली साऊथ ची अभिनेत्री रश्मीका मंधाना हे २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थान मधील उदयपूर येथे सप्तपदी घेऊन विवाह बंधनात अडकरणार आहेत. तसेच त्यांनी आपल्या या विवाहाला ‘Virosh’ (विरोष) हे नाव दिले आहे.

विजय आणि रश्मिका आपल्या लग्नाला घेऊन खूप खुश आहेत. तसेच या लग्नाची प्री वेडिंग शूट हे देखील दोन दिवस आधी पासूनच म्हणजे २३ – २४ फेब्रुवारीलाच सुरू झालेले आहे.

लग्नाबद्दल काही माहिती पाहूया –

वधू-वराचे नावरश्मिका मंधाना आणि विजय देवराकोंडा
विवाहाला दिले गेलेले नावविरोष ( विजय आणि रश्मिका या दोन नावांचे एकत्रित नाव)
विवाह तारीख 26 फेब्रुवारी 2026
विवाह स्थळआई.टी.सी. मोमेंटोस हॉटेल रिसॉर्ट, उदयपूर, ( राजस्थान )
रिसेप्शन सोहळा3 आणि 4 फेब्रुवारी (हैदराबाद)
पाहुण्यांची उपस्थितीअंदाजे 200 +

Vijay-Rashmika Wedding Confirm 2026 : या लग्नाला Virosh (विरोष) नाव का दिले गेले?

थोड्या दिवसांपूर्वी रश्मीकाने एक पोस्ट केली होती. जिच्यामध्ये तिने लिहिलं होतं की तुम्ही मायबाप रसिक प्रेक्षकांनीच आम्हाला हे नाव दिलात. विरोष म्हणजे विजय आणि रश्मिका या दोन नावांचा एकत्र मिलन होय. आणि म्हणून आमच्या लग्ना ला देखील आम्ही विरोश हे नाव दिलंय.

रश्मिका ने केलेली पोस्ट –

Our Dearest loves,

Before we made any plans,
before we chose anything for ourselves-

you were already there.

With so much love, you gave us a name.
You called us “VIROSH”.

So today – with full hearts,
we name our coming together in your honour.

“The Wedding of VIROSH” ❤️

Thank you for holding us with love.

You are a part of us- always ❤️

Biggest hugs and full love! 🤗 ❤️

Vijay-Rashmika Wedding Confirm 2026 : रश्मिका आणि विजय यांची लव्ह स्टोरी

2018 साली विजय आणि रश्मिका यांची पहिली भेट ही गीता गोविंदम या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सिल्वर झाली. तसेच हा चित्रपट देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडला. चित्रपटामध्ये जशी विजय आणि रश्मीची केमिस्ट्री वाटत होती तशीच ती रियल लाईफ मध्ये देखील अशीच असावी असं सर्वांना वाटू लागले. आणि मार्केटमध्ये अफवांना सुरुवात झाली.

त्यानंतर 2019 साली रियल कॉम्रेड या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हे दोन्ही फेमस पर्सनॅलिटी परत एकदा कपलच्या रूपाने प्रेक्षकांच्या समोर आले. आणि पडद्यावरच त्यांच हे नातं सर्वांना हळूहळू खरंच वाटू लागल. दरम्यान वास्तविक जीवनात त्यांच्यामधील मैत्री देखील वाढत गेली. शिवाय एका रिपोर्टनुसार असे मानले जाते की रश्मिकाचा नुकताच ब्रेकअप झाला होता. आणि विजय हा तिला आधार देण्यासाठी मित्र म्हणून तिच्या सोबत होता. आणि ही सगळी केअरिंग पाहून दोघांमधली मैत्री देखील हळूहळू प्रेमाचं रूप घेऊ लागले आणि इथून दोघांच्या लव स्टोरी ला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात आपलं नातं हे दोघांनीही गुपित ठेवलं परंतु आता ते सर्वांसमोर दोघांनीही जाहीर केले आहे.

Vijay-Rashmika Wedding Confirm 2026 : पाहुण्यांची उपस्थिती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रश्मिका आणि विजय यांच्या लग्नासाठी अंदाजे 200+ पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दोघेही वधू-वरांचे कुटुंब दोन दिवस पूर्वीच उदयपूर येथे दाखल झाले. आपले जवळची मित्रमंडळी, तसेच आप्तेष्ट परिवार, सिनेसृष्टी मधील काही सहकारी, डायरेक्टर, निर्माते, कलाकार, राजकारणी आणि अन्य समाजातील मान्यवर उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे.

विजय आणि रश्मिका यांचा रिसेप्शन सोहळा हा हैदराबाद किंवा बंजारा हिल्स येथे एखाद्या लक्झरीयस ठिकाणी 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात येणार आहे.

Vijay-Rashmika Wedding Confirm 2026 : लग्नाचे फंक्शन्स

लग्नामध्ये आपल्याला अनेक पारंपरिक साउथ इंडियन पद्धती पाहायला मिळणार आहेत. तसेच संगीत, मेहंदी हे कार्यक्रम देखील जल्लोषामध्ये पार पडणार आहेत.

एका विश्वासनय माहिती स्त्रोताच्या आधारे असे समजले की रश्मिका आणि विजयचा हा विवाह सोहळा पारंपारिक पद्धतीने तर साजरा होणारच आहे. परंतु सोबतच enjoyment mhnun अजून एक वेगळी पद्धत अवलंबली गेली होती. वेडिंग वीक म्हणून या दोघांनी विरोष या नावाने विविध स्पोर्ट्स गेम चे आयोजन केले होते. ज्यामध्ये खेळाच्या प्रत्येक वस्तूंवर विरोष हे नाव लिहिले होते. तसेच या स्पोर्ट्स इव्हेंट मध्ये कुटुंबातील सर्व सदस्य, जवळचे मित्रमंडळी यांनी सहभाग दर्शवून मनमुराद आनंद लुटला.

Vijay-Rashmika Wedding Confirm 2026 : जेवणाचे वेगवेगळे प्रकार

हा विवाह सोहळा एकदम शाही पद्धतीने केला जाणार आहे. त्यामुळे जेवणाचे ही विविध प्रकार नक्कीच आढळून येण्याची दाट शक्यता आहे. साउथ इंडियन जेवण सोबतच पंजाबी आणि जापनीस भोजनाचा आस्वाद देखील पाहूणे मंडळींना घ्यायला मिळणार.

Vijay-Rashmika Wedding Confirm 2026 : विजयच्या पालकांना सुने बद्दल फक्त ही अपेक्षा आहे

गीता गोविंदम हा चित्रपट जेव्हा 2018 साली प्रदर्शित झाला होता. तेव्हा प्रसार माध्यमांनी विजयच्या आई-वडिलांना होणाऱ्या सुनेबद्दल काय अपेक्षा आहे? किंवा त्यांना काय वाटतं? असा प्रश्न विचारला तेव्हा विजय चे वडील म्हणाले की “होणारी सून ही कुठल्याही जाती धर्माची असली तरी आम्हाला ती मान्य आहे”.तसेच “विजय जिच्यावर प्रेम करेल, तिच्याशीच तो लग्न करेल यात आमची काही हरकत नाही”. असे वडिलांनी ठामपणे सांगितले.

त्यानंतर विजयची आई म्हणाली की “मला अशी सून हवी आहे जी फक्त विजय वर निस्वार्थ प्रेम करेल आणि त्याची काळजी घेईल.”या अपेक्षा विजयाच्या आई-वडिलांना आपल्या होणाऱ्या सुनेबद्दल आहेत.

Vijay-Rashmika Wedding Confirm 2026 : रश्मिकाच या आधीही लग्न झालं आहे का ?

अभिनेत्री रश्मिका मानधन हीच याआधी लग्न झालेल नाही. या आधी तिने वयाच्या 21 व्या वर्षी रक्षित शेट्टी नावाच्या एका अभिनेत्याशी साखरपुडा केला होता. परंतु काही वैयक्तिक कारणामुळे त्यांचा ब्रेक अप झाला होता.

Leave a Comment