Jab Khuli Kitaab Movie Review in Marathi 2026:( रिव्यू आणि माहिती, कथा, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, ट्रेलर, ड्युरेशन, स्टार परफॉर्मन्स, गुड ओर बॅड, बॉक्स ऑफिस कलेक्शन, OTT रिलीज डेट, OTT रिलीज प्लॅटफॉर्म, तिकीट बुकिंग )

Jab Khuli Kitaab Movie Review in Marathi 2026: मित्रानो पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्या अभिनयाने सजलेला हा कौटुंबिक चित्रपट ६ मार्च २०२६ रोजी Zee5 वर सर्वत्र प्रदर्शित झाला. सौरभ शुक्ला दिग्दर्शित जब खुली किताब हा चित्रपट पूर्णपणे पारिवारिक सिनेमा आहे. या सिनेमा मध्ये परिवारातील प्रेम, विश्वास, एकमेकांची साथ, धूस पुस, नाराजगी अशा अनेक गोष्टी आहेत.
चित्रपटामध्ये अनेक भावनिक प्रसंग दाखवले आहेत. वर्षानुवर्षे उभी असलेले नाती कशा एका चुकीच्या निर्णयामुळे दूर जाऊ शकतात. याचे सुंदर चित्रीकरण या चित्रपटात दाखवले गेले आहे.
Jab Khuli Kitaab Movie Review in Marathi 2026 : संपूर्ण रिव्यू आणि माहिती
चित्रपटाचे स्वरूप असे आहे की, परिवारातील मुख्य सदस्य यांची पत्नी ही दोन वर्ष कोमामध्ये असते. आणि अचानक शुद्धीवर येऊन ती खूप आधी घडलेली एक घटना आपल्या पतीला सांगते. आणि त्यामुळे ते मुख्य सदस्य म्हणजेच त्या स्त्रीचे पती यांना खूप दुःख होते. आणि ते या उतार वयामध्ये आपल्या पत्नीपासून वेगळा व्हायचा निर्णय घेतात. व या सर्व गोष्टींमुळे परिवारातील सुख, आनंद, हर्ष उल्हास, एकी यांच्यावर विरजण पडते. व या सगळ्या गोष्टी मधून कसा मार्ग निघतो ते या चित्रपटांमध्ये दाखवले आहे.
Jab Khuli Kitaab Movie Review in Marathi 2026 : माहिती
| तपशील | माहिती |
|---|---|
| चित्रपटाचे नाव | जब खुली किताब (Jab Khuli Kitaab) |
| रिलीज डेट | ६ मार्च २०२६ |
| ट्रेलर रिलीज डेट | २३ फेब्रुवारी २०२६ |
| दिग्दर्शक | सौरभ शुक्ला |
| निर्माते | समीर सोनी आणि रश्मी शर्मा |
| कलाकार | पंकज कपूर, डिंपल कपाड़िया, अपारशक्ति खुराना, समीर सोनी |
| चित्रपटाचा कालावधी | सुमारे २ तास |
| ओटीटी प्लॅटफॉर्म | ZEE5 |
| शूटिंग लोकेशन | मसुरी आणि उत्तराखंड |
Jab Khuli Kitaab Movie Review in Marathi 2026 : कथा
चित्रपटाची कथा एका गोड कुटुंबापासून सुरू होते. गोपालजी म्हणजेच (पंकज कपूर) हे संबंधित परिवारामधले मुख्य सदस्य असतात आणि त्यांची पत्नी ही अनुसूया (डिंपल कपाडिया) ही मागच्या २ वर्षांपासून कोमामध्ये असते आणि त्यांची तब्येत एवढी खराब असते की कोणाला वाटत नसते की ती परत बरी होईल किंवा शुद्धीवर येईल.
आणि अचानक एकेदिवशी पत्नी अनुसूया तब्बल २ वर्षांनी कोमामधून बाहेर येते. आणि आपल्या पतीला म्हणजेच गोपालजी ( पंकज कपूर) यांना आपल्या भूतकाळातील ४८ वर्षांपूर्वी घडलेली क खाजगी गोष्टी सांगते आणि ती गोष्टी ऐकून गोपालजी (पंकज कपूर) यांना खूप मोठा मानसिक धक्का बसतो. आणि अचानक सगळ्या गोष्टी बदलतात. खूप विसरण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्या ध्यानातून ती गोष्ट जात नसते तसेच त्यांच्या विवाहित जीवनातही त्यांना रस येत नसतो म्हणून ते कुटुंबातील सदस्यांना न सांगता घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात आणि वकिलाला गाठतात.
वकिलाचे नाव आर.के.नेगी आहे. आणि त्याची भूमिका ही अपारशक्ती खुराना याने केली आहे. चित्रपटामध्ये आर.के.नेगी याची ही एक छोटीशी प्रेम कहाणी दाखवली आहे. त्याचे एका न्यायाधीशवर प्रेम असते. जिचे नाव आशा आहे आणि जिची भूमिका ही (मानसी पारेख) हिने केलीय. गोपालजींचा (पंकज कपूर) हा निर्णय ऐकून वकील साहेबांना पण आश्चर्य वाटत आणि या वयामध्ये (५० वर्षे) असे एकमेकांना सोडण योग्य नाही असे त्यांना वाटत असते. परंतु गोपालजी (पंकज कपूर) हे आपल्या निर्णयावर ठाम दाखवले आहेत.
काही दिवसानंतर गोपालजींच्या घरात ५० व्या वाढदिवसानिमित्त एक भव्य पार्टी चे आयोजन केले जाते. आणि त्या पार्टी दरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडते आणि डॉक्टरांकडून असे समजते की गोपालजींना Alzheimer (अल्झायमर) नावाची बिमारी आहे. तर गोपालजी आणि अनुसया पुन्हा एकदा कसे एकत्र येतात ? आणि कशी त्यांची केस्मिट्री जुळते ? हे आपल्याला चित्रपट पाहूनच समजते.
Jab Khuli Kitaab Movie in Marathi 2026 : cast (कलाकारांची नावे आणि अंदाजित मानधन )
| कलाकार | भूमिकेचे नाव | अंदाजित मानधन (₹) |
|---|---|---|
| पंकज कपूर | गोपाळ | १ – २ कोटी |
| डिंपल कपाडिया | अनुसूया | १.५ – २.५ कोटी |
| अपारशक्ति खुराना | वकील | ५० – ७० लाख |
| समीर सोनी | सहाय्यक भूमिका | २० – ३० लाख |
| नौहीद सायरसी | सहाय्यक भूमिका | १० – १५ लाख |
*टीप: हे मानधन अधिकृत आकडा नसून चित्रपट क्षेत्रातील सूत्रांच्या अंदाजावर आधारित आहे.
Jab Khuli Kitaab Movie Review in Marathi 2026 : ट्रेलर
Jab Khuli Kitaab Movie Review in Marathi 2026 : चित्रपट पहावा की नाही ?
ज्यांना फॅमिली ड्रामा आवडतो त्यांनी नक्की हा चित्रपट पहावा. कारण चित्रपटामध्ये आपल्या रोजच्या फॉलिमी जीवनातील अडीअडचणी दाखवल्या आहेत आणि एखादी समस्या आपल्या विवाहित जीवनात खूप वर्षांनी जरी उद्भवली तरी त्या कसे तोंड द्यावे आणि संबंध परत कसे सुरळीत करावे याची खूप मोठी शिकवण या सिनेमामधून मिळते.
Jab Khuli Kitaab Movie Review in Marathi 2026 : चित्रपटाबद्दल चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी
चांगली गोष्ट –
चित्रपटामध्ये असलेली कुटुंब वात्सल्य भावना, प्रेम, एकमेकांना धरून ठेवण्याची भावना ही प्रेक्षकांना आकर्षित करते.
वाईट गोष्ट –
काही ठिकाणी मध्ये मध्ये जे ट्विस्ट ॲड केलेत ते जरा जबरदस्ती ने ॲड केले आहेत असे वाटते.
Jab Khuli Kitaab Movie Review in Marathi 2026 : बॉक्स ऑफिस कलेक्शन
अजून बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल अधिकृत माहिती नाही.
FAQ–
1) जब खुली किताब या चित्रपटात मुख्य कलाकार कोण आहेत?
उत्तर – पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया हे मुख्य कलाकार आहेत.
2) जब खुली किताब हा चित्रपट कधी रिलीज झाला?
उत्तर – ६ मार्च २०२६ रोजी
3) जब खुली किताब हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे का?
उत्तर – नाही, जब खुली किताब हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित नाही.
4) जब खुली किताब हा चित्रपट कुठच्या OTT प्लॅटफॉर्म वर रिलीज झाला?
उत्तर– Zee5, या OTT प्लॅटफॉर्म वर जब खुली किताब हा चित्रपट रिलीज झाला.